शंभूराजेंची जयंती उत्साहात साजरी, जयंतीचे औचित्य साधून टाँपकार सर्विस सेंटरचे उद्घाटन !

सिन्नरला छत्रपती संभाजी राजे जयंती उत्साहात साजरी,
टाँपकार सर्विस सेंटरचे उद्घाटन !

सिन्नर(१४)::-नासिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आज शंभूराजेंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, जयंती समारोहाचे आयोजन विलास पांगारकर यांनी केले होते, यांवेळी सिन्नर पंचक्रोशितील सामाजिक, राजकीय तसेच तरूण , ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,
    शंभूराजेंच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून विशाल पांगारकर यांनी टाँपकार या दालनाची सुरूवात केली. सिन्नर तालुक्यातील चारचाकी वाहन धारकांसाठी व्हिल अलायमेंट, सर्विसिंग, अँक्सेसरीज, विविध कंपन्यांचे टायर तसेच कार डेकोरेशन या शहरांत मिळणाऱ्या सुविधा टाँपकारच्या दालनांतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहीती संचालक विशाल पांगारकर यांनी दिली.
सदर दालनाचे उद्घाटन सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले, यांवेळी नासिक जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे , छावाचे किशोर चव्हाण, नासिक ग्रामीण पोलीस अधिकारी आंधळे आदी मान्यवर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।