क्रुषी विभाग-----पदाचा दुरूपयोग करून लाभ मिळविल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत विभागाकडून विभागीय क्रुषी अधिकारी, तालुका क्रुषी अधिकाऱ्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर जा !!


सन 2015-2016 मध्ये मौजे जळगाव ता. बारामती येथील ग्रामस्थांसाठी खासदार निधीतून मंजूर  सिमेंट नाला बांधकामातील निविदा प्रक्रिया पूर्ण करताना आरोपी नामे (१) गोविंद पर्वतराव परजणे तत्कालीन विभागीय क्रुषी अधिकारी, (२)संतोषकुमार नारायण बरगडे तालुका क्रुषी अधिकारी,(३) पोपट शंकर ठोंबरे मंडळ क्रुषी अधिकारी,(४) शाहूराज हरिश्चंद्र मोरे क्रुषी पर्यवेक्षक,(५) विजय किसन चांदगुडे क्रुषी सहाय्यक यांनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून कॉन्ट्रॅक्टर ने मुदतीत कामे पूर्ण केली नाही. म्हणून नव्याने सिद्धांत कन्स्ट्रक्शन यांनी निविदा भरलेली नसताना त्यांचा फायदा होण्याच्या हेतूने त्यांच्या नावाने कामाचे कार्यरंभाचे आदेश अधिकारात नसताना बेकायदेशीरपणे काढले. तसेच सिद्धांत कन्स्ट्रक्शन कडून अनामत रक्कमा व अतिरिक्त सुरक्षा ठेव भरून घेतल्या नाहीत. अशा प्रकारे आरोपी क्रमांक 1 ते 5 यांनी आपल्या नियंत्रणात असलेल्या शासकीय रक्कमेचा वापर सिद्धांत कन्स्ट्रक्शन याना करून देण्यास मुभा दिली व त्यांचा आर्थिक लाभ व्हावा या हेतूने पदाचा दुरुपयोग केला व सिद्धांत कन्स्ट्रक्शनचे   प्रोपरायटर शिवाजी एकनाथ भोंडवे यांनी निविदा भरलेली नसताना बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून कामे मिळवली म्हणूण  मलालूप्रकाक 13 (1) (क), 13(1)(ड) सह 13(2)  व भा.द.वि. कलम 109.  प्रमाणे बारामती शहर पोलीस ठाणे गुरनं 252/2018 अन्वये चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!