राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजनांच्या गावांच्या समावेशासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत !


नाशिक – राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यातील नवीन पाणी पुरवठा योजनांच्या गावांचा समावेश करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

शासनाच्या सूचनांनुसार सदरची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने प्राप्त स्थळ पाहणी अहवालानुसार गावातील पिण्याच्या पाण्याची सध्यस्थिती, नवीन योजनेची आवश्यकता व व्यवहार्यता याबाबत सविस्तर आढावा घेऊन नवीन योजनेची आवश्यकता असलेल्या गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्याबाबत शिफारस करावयाची आहे. समितीने शिफारस केलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनांच्या गावांची यादी स्थळ पाहणी अहवालानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांचे मार्फत संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांचेकडे सादर करावयाची आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हे सदस्य सचिव असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व भूजल सनियंत्रण व सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक हे सदस्य आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

हा घ्या पुरावा ! प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती ? पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे !! जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला !!! क्रियाशील कोण आमदार आहेत ? सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!