छत्रपती शिवाजी महाराजांचा, जबाबदारी पेलणारा मावळा. कोंडाजी फर्जंद एक जून रोजी अवतरणार !!!

छत्रपती शिवाजी महाराजांचा जबाबदारी पेलणारा मावळा कोंडाजी एक जून रोजी अवतरणार !
नासिक::- छत्रपती शिवाजी महाराज आणी शिवकाल मराठी अस्मितेचा विषय असुन त्या विषयाला ४० वर्षापूर्वी भालजी पेंढारकरांनी स्पर्श केला, त्यानंतर तसा भारदस्त प्रयत्न कुणी केल्याचं दिसत नाही.
    तत्कालीन भौगोलिक व संरक्षणाच्या बाबत पन्हाळा किल्ल्याचे महत्व, महाराजांचा राज्याभिषेक व पन्हाळ्याच्या आसपासच्या रयतेवरील अन्याय यांसाठी पन्हाळा मराठी मुलखात आणणे महाराजांना गरजेचे होते, म्हणून महाराजांनी कोंडाजी फर्जंद या मावळ्यावर जबाबदारी सोपविली.
     "आपण फकस्त लढायचं....आपल्या राजांसाठी....आन् स्वराज्यासाठी.....!
     असं म्हणत कोंडाजी फर्जंद या योद्ध्याने ६० मावळ्यांना सोबत घेत २५०० विजापुरी सैनिकांशी लढून साडेतीन तासात पन्हाळा जिंकून दिला, हा हिंदवी स्वराज्याचा मावळा कोंडाजी फर्जंद च्या पराक्रमाची गाथा १ जूनला रूपेरी पडद्यावर जिवंत होत आहे.
     "स्वामी समर्थ मुव्हिज क्रिएशन एलएलपी" ची प्रस्तुती असलेल्या चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार असुन सहनिर्माते संदिप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्निल पोतदार  आहेत, लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरांनी केले आहे.
         दिग्गज कलाकारांच्या भुमिका असलेल्या या चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर  तर कोंडाजी फर्जंद च्या दमदार भूमिकेत अंकित मोहन आहे, सोबत गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पुरकर, म्रुणाल कुलकर्णी, म्रुण्मयी देशपांडे, प्रविण तरडे, अस्ताद काळे, हरीश दुधाडे, नेहा जोशी, राहुल मेहंदळे, निखिल राऊत, राजन भिसे, अंशुमन विचारे, रोहण मंकणी, सचिन देशपांडे, समीर धर्माधिकारी, तसेच "तेरे बिन लादेन" मधील लादेनची भूमिका साकारणारा प्रघ्दुमन सिंग आहेत.
      कथेशी निगडीत चार गीते आहेत, आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी स्वरबद्ध केली आहेत.
       "राखू या ना मर्जी स्वारींची" ही लावणी तर "आई अंबे जगदंबे तारी संगरात" हा ठेका धरायला लावणारा गोंधळ आहे.
       कोंडाजीची संघर्षमय यशस्वी गाथा....छत्रपतींची धोरणी भूमिका अन् लढवय्ये मावळ्यांचे योगदान हे सारं उलगडून दाखविणारा शिवकालीन युद्धपट बघायला काय हरकत !!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक