श्री.श्री.रविशंकरजी नगर फलकाचे अनावरण

किशोर पाटील यांजकडून,

विंचूर, दि.१४  येथील श्री श्री ध्यान केंद्र विंचूर परीसराला श्री श्री रविशंकर नगर हे नाव देण्यासाठी परीसरातील नागरीकांनी एकञ येवुन ग्रामपालीकेकडे अर्ज दाखल करुन नाव देण्याची मागणी केली. ग्रामपालीकेने मासिक बैठकीत एक मताने  श्री श्री रविशंकर नाव देण्यास अनुमती दिली.
         आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक तथा प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांचा दि.१३ मे रोजी वाढदिवस असल्याने त्याचे औचित्य साधत श्री श्री ध्यान केंद्रात सुदर्शन क्रिया, योगा,प्राणायाम, संत्संग, गुरुपुजा आदी कार्यक्रम संपंन्न झाले. त्यानंतर श्री श्री रविशंकरजी नगर फलकाचे उदघाटन पं.स.सदस्य संजय शेवाळे, सरपंच ताराबाई क्षीरसागर, विष्णुनगर सरपंच किशोर मवाळ, टाकळी विंचूर विद्यालयाचे प्राचार्य पी.बी.चौरे आदी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपंन्न झाले.
         यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक किशोर पाटील प्रास्तविक व उपस्थितीतांचे स्वागत केले.कार्यक्रमास भागिरथ निकम,विजय लोहारकर,बापुसाहेब सोदक,गजेंद्र शिंदे, मयुर गोरे,पंकज सोनवणे, एम.एम.पवार, वेननाथ माधव,बालीबाई सोनवणे, दरेकर, कुमावत आदी नागरीक उपस्थितीत होते.आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक बी.एन.कदम यांनी उपस्थितीतांना आर्ट ऑफ लिव्हिंग विषयी माहीती विषद करुन आभार मानले.कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग विंचूर परीवाराने परीश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!