जिल्हा परिषदेत ई-निविदा नियंत्रण कक्षाची स्थापना, कामकाज लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम होणार !

नाशिक – शासनाच्या निर्देशानुसार ई गव्हर्नन्न्सच्या प्रभावी अंबलबजावणीसाठी जिल्हा परिषदस्तरावर मध्यवर्ती ई निविदा कक्ष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व निविदांबाबतचे काम या कक्षामार्फत करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे कामकाज लोकाभिमुख,पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या वतीने ई निविदा काढण्यात येतात मात्र यामध्ये सुसूत्रता यावी व एकाच ठिकाणाहून सदरचे काम व्हावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गिते यांनी पुढाकार घेऊन ई निविदा कक्ष नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. डॉ गिते हे या समितीचे अध्यक्ष असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सनियंत्रक तथा सह अध्यक्ष, कार्यकारी अभियंता इवद क्र ३ हे सदस्य सचिव व सर्व विभागांचे प्रमुख हे सदस्य असणार आहेत.

या कक्षाच्या वतीने विविध विभागनिहाय प्राप्त निविदांची नोंद ई निविदा आवक नोंदवहीत करणे, निविदा अपलोड करणे, निविदा उघडणे आदि निविदेशी संबंधित सर्व प्रकारची काम करावयाची आहेत. या कक्षाच्या स्थापनेमुळे ई निविदा कामाबाबत तांत्रिक अडचणी येणाऱ्या विविध विभागांची मोठी सोय झाली होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!