पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतांनाच शहराला पुढील तीन दिवसांत नवीन पोलीस आयुक्त देणार-मुख्यमंत्री

औरंगाबादला ७२ तासांत मिळणार नवे पोलीस आयुक्त:मुख्यमंत्री.

औरंगाबादच्या दंगलीनंतर पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत असतानाच आता शहराला पुढच्या तीन दिवसात नवा पोलीस आयुक्त  देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर काल रात्री उशिरा भेट घेतली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आलं. औरंगाबाद दंगलीप्रकरणी संबंधितांवर कठोरकारवाईची मागणी सर्वपक्षीयांनी या बैठकीत केली. त्यावर आयपीएस अधिकाऱ्यांची एक उच्च स्तरिय चौकशी समिती नेण्याचंही मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय.दरम्यान, दंगलग्रस्तांना नुकसान भरपाईची मागणीही यावेळी मान्य करण्यात आली.  दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून निरपराध लोकांची सुटका करण्यात येईल असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

स्त्रोत,सौजन्याने-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।