भुजबळांच्या पाठपुराव्यामुळे येवला उपजिल्हा रूग्णालयासाठी ७० व खडकमाळेगांव प्रा.आरोग्यकेंद्रासाठी १५ पदांना शासनाची मंजुरी.

           नाशिक,येवला,दि.२४ मे:- नाशिक येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयातील कर्करोग व किडनी प्रत्यारोपन विभागासह येवला येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झालेल्या रुग्णालय तसेच निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. विभागीय संदर्भसेवा रुग्णालयातील आकृतीबंधासह  येवला ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालय करण्यासाठी छगन भुजबळ हे सातत्याने पाठपुरावा करत होते.

          येवला रुग्णालयाचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून इमारतीच्या ८ कोटी ५० लक्षच्या बांधकामास राज्य शासनाकडून दि.१४ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हे बांधकाम सुरु व्हावे यासाठी भुजबळांचा पाठपुरावा सुरूच होता. या इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून आता येथील पदांचा आकृतीबंध सुद्धा मंजूर झाल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.

          येवला शहर व तालुक्याचा विस्तार बघता शहर व तालुक्यातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा येवला शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आग्रही होते. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून येवला शहरात ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची सुंदर इमारत उपलब्ध करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर शहर व तालुक्यातील नागरिकांना सर्व वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी येवला ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास पाठपुरावा केला होता. तसेच खडकमाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुद्धा त्यांचा पाठपुरावा सुरु होता.

          येवला शहरात उपजिल्हा रुग्णालय होत असल्याने येवला शहराबरोबरच तालुक्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. सदर उपजिल्हा रुग्णालयासाठी  एकूण ७० नवीन पदांना मंजुरी मिळाली आहे. त्यात एक वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, वैद्यकीय स्त्री व प्रस्तुती रोग तज्ञ, दोन बधिरीकरण शास्त्रज्ञ,वैद्यकीय अधिकारी भिषक, बालरोगतज्ञ,एक अस्थिव्यंग तज्ञ, एक नेत्र शल्यचिकीत्सक,एक दंत चिकित्सक, एक वैद्यकीय अधिकारी अपघात, एक वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक अधिसेविका,पाच परिसेविका, एक प्रशासकीय अधिकारी,एक कार्यालयीन अधीक्षक तर २० अधिपरिचारिका यांच्यासह एक भौतिकोपचार तज्ञ,एक आहार तज्ञ, दोन रक्तपेढी तज्ञ, एक प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, एक क्षकिरण विभाग,एक इसीजी तंत्रज्ञ, दोन औषध निर्माण अधिकारी, दोन प्रयोगशाळा सहाय्यक,एक भांडार तथा वस्त्रपाल, एक बाह्यरुग्ण सेवक, तीन अपघात विभाग सेवक, १ रक्तपेढी परिचर, दोन शस्त्रक्रिया परिचर, एक व्रणोपचारक, दोन बाह्यरुग्ण लिपिक, ६ कक्षसेवक, एक शिपाई,एक सफाईगार अशी एकूण ७० पदे मंजूर करण्यात आली आहे.  
       येवला उपजिल्हा रुग्णालयातील अस्तित्वातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ७० बेडचे वार्ड, अद्ययावत आयसीयु, ऑपरेशन थिएटर, प्रशासकीय विभाग, रक्तपेढी,प्रयोगशाळा तर दुसऱ्या मजल्यावर मेडिकल कॅम्प हॉल, ट्रामा केअर युनिट इ. बाबींचा समावेश असेल. मागील मोकळ्या भूखंडामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची धर्मशाळा,कॅटीन तर रूग्णालयाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट इत्यादींचा समावेश आहे. सदर इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून या ठिकाणी विशेष अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री पुरविली जाणार आहे. या उपजिल्हा रूग्णालयामुळे या भागातील रुग्णांना येवला येथे विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल.

खडकमाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पदांचा आकृतीबंध मंजूर
       त्याचबरोबर खडकमाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकूण १५ पदे मंजूर करण्यात आली असून त्यात दोन वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सहायक(पुरुष),एक आरोग्य सहायक (स्त्री), एक सहायक परिचारिका प्रसविका,एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ,एक औषध निर्माण अधिकारी, एक आरोग्य सहायक, एक कनिष्ठ लिपिक, एक वाहनचालक, एक स्त्री परिचर, तीन पुरुष परिचर व एक सफाईगार या पदांचा समावेश आहे. खडकमाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य इमारत पूर्ण होत असून पदांचा आकृतीबंध मंजूर झाल्याने लवकरच हे आरोग्य केंद्र कार्यान्वित होवून या भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणार आहे.
       नाशिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील कर्करोग व किडनी प्रत्यारोपन
शस्त्रक्रिया विभागासाठी पदांचा आकृतीबंध मंजूर

नाशिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील कर्करोग व किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रिया विभागासाठी  दोन वैद्यकीय अधिकारी,एक शस्त्रक्रिया वैद्यकीय अधिकारी, एक स्त्री रोग प्रसुती वैद्यकीय अधिकारी या पदांसह एकूण १७३ पदांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी छगन भुजबळ यांचा कारागृहातून सतत पत्राद्वारे तसेच विधीमंडळातील विविध आयुधांद्वारे पाठपुरावा सुरु होता. येथील पदांचा आकृतीबंध मंजूर झाल्यामुळे आता संदर्भ सेवा रुग्णालयातील कर्करोग विभाग व किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागातील पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !