कार्यालयीन वेळेत संगणकावर दूरचित्रवाणी पहाणे व पत्त्यांचा खेळ खेळणे पडले महागात ! कर्मचारी निलंबित !


नाशिक – शासकीय कार्यालयात संगणकावर दूरचित्रवाणी वाहिनी बघणे आणि पत्यांचा खेळ खेळणे जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ सहायकास चांगलेच महाग पडले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदर कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सदर कर्मचारी याकामात इतका गुंग झाला होता की मुख्य कार्यकारी आपल्यापाठीमागे गुपचूप येऊन २० मिनिट बसून हा सर्व प्रकार बघत असल्याचे भानही त्यास राहिले नाही.

शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या शरणपूररोड येथील कार्यालयात अचानक भेट दिली. यावेळी कार्यालयातील वरिष्ठ सहायक आर.के.गांगुर्डे हे कायालयीन कामकाजा ऐवजी संगणकावर दूरचित्रवाणी लावून बातम्या बघत असल्याचे व पत्यांचा खेळ खेळत असल्याचे निदर्शनास आले. संगणकात व्यस्त असलेल्या गांगुर्डे यांना डॉ गिते कार्यालयात आल्याचे व आपल्या मागे बसून असल्याचे लक्षातही आले नाही. याबाबत डॉ गिते यांनी त्वरित सदर कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे नियम ३ (१) (अ) अन्वये वरिष्ठ सहायक गांगुर्डे यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।