आपल्याकडे शेती नसेल तरीही प्रत्यक्ष शेतात जाऊन विषमुक्त भाजीपाला लागवडीसह सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र !

विषमुक्त भाजीपाला लागवडीसह मिळणार सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र!

नाशकातील मृद‍्गंध @ यंदे फार्म कडून अनोखी व्यवस्था सादर !

       नाशिक::- शहरी जीवनशैलीचा अंगीकार करणार्‍यांना एकाच वेळी सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाचा वेगळा अनुभव देताना दुसरीकडे दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करणारी अभिनव व्यवस्था नाशिक शहरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती यंदे फार्मच्या संचालिका स्मिता यंदे यांनी दिली. पुण्यामधील मृद‍्गंध स्टार्ट-अपच्या ​संयुक्त विद्यमाने नाशकात त्र्यंबकरोडवर हा प्रकल्प आकारणीस येत असल्याचे यंदे यांनी सांगितले.

        यासंदर्भात अधिक माहिती देताना यंदे यांनी सांगितले की, शेतामध्ये भाडेतत्वावर उपलब्ध करून दिलेल्या सुमारे ७५० चौरस फूट जागेत गादीवाफे तयार करून भाज्यांची शेती करण्याची संधी यामध्ये दिली जाणार आहे. हे प्लॉट्स किमान सहा महिन्यांसाठी देताना त्यामधून सेंद्रिय पध्दतीने भाजीपाल्याची लागवड करता येणार आहे. यासाठी आवश्यक ते साहित्य मृद‍्गंध @ यंदे फार्मच्या वतीने पुरवण्यात येणार असून बिया आणि तत्सम वस्तू उत्पादक आणू शकतात. विषमुक्त भाजीपाल्याची लागवड करून सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र यामधून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यंदे म्हणाल्या.
काय आहे प्रकल्प?
स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी सजग असणार्‍यांना या प्रकल्पात सहभागी होता येणार आहे. शनिवार-रविवार अथवा आपल्या सोयीनुसार मृद‍्गंध @ यंदे फार्मवर येऊन भाजीपाला लागवडीच्या दृष्टीने गादीवाफ्याची निर्मिती आणि मशागत करता येणार आहे. यानिमित्त शहरी कोलाहलाटापासून दूर राहून तणावमुक्त क्षण घालवण्याचीही संधी राहाणार आहे. शहरवासियांना शेतकर्‍याचे कष्ट कळावेत, पाक लागवड ते काढणीपर्यंतची प्रक्रिया समजावी, अन्नधान्य तसेच पिकांचे महत्व कळावे, हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
काय करावे लागणार?
     गादीवाफ्याची मशागत करताना शेणखत, गांडूळखत मिसळणे, स्वत:च्या हाताने भाजीपाला बियाणे, रोपांची लागवड करणे, मातीची भर टाकणे, झारीने पाणी घालणे आदी बाबी प्रकल्पात सहभागी नागरिकांना कराव्या लागणार आहेत.
        यासंदर्भातील अधिक माहितीसाठी स्मिता यंदे यांच्याशी 9766757988 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !