२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !

२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !

       २५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हा संघ विश्वचषकात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेला तेव्हा या संघाकडून कोणालाच अपेक्षा नव्हती, पण युवा भारतीय संघाने आपल्या समर्पणाने आणि मेहनतीने जगातील सर्व संघांना गुडघे टेकायला लावून २५ जून १९८३ ला क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्डस वर दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा अंतिम फेरीत पराभव करून विश्वचषक जिंकला.


त्या विजयानंतर क्रिकेट हा खेळ भारतात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताच्या १७ धावांत पाच विकेट पडल्यानंतर तरूण कर्णधार कपिल देवची नाबाद १७५ धावांची खेळी क्रिकेटच्या इतिहासात एक दंतकथा बनली आहे.
 विश्वचषक विजय हा सामूहिक विजय होता. त्या विजयात प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कामगिरी केली. हा ऐतिहासिक विजय सर्व खेळाडूंसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्या विजयानंतर भारतीय संघाकडे आदराने पाहिले जात होते. क्रिकेटप्रेमी तो दिवस कधीच विसरणार नाहीत. तो ऐतिहासिक दिवस क्रिकेट दिन म्हणून लक्षात ठेवायला हवा !                     प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जलसंपदा विभागाने हिशेब द्यावा, नाशिककरांना ठोस उत्तरे द्यायला हवीत !

बातमी अशी कुठे असते का ? एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान गुण !! हेच विशेष आहे या बातमीत, खालील लिंकवर क्लिक करून वाचा व कमेंट बाॅक्समध्ये अभिप्राय नोंदवा !!!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन, अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या–मुख्यमंत्री