अधिकारी व दोन सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

अधिकारी व दोन सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

        नाशिक::- आलोसे श्रीमती वैशाली दगडू पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी , नाशिक, संजय रामू राव, आरोग्य सेवक, व कैलास गंगाधर शिंदे, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, नाशिक, यांना लाचलुचपत विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.   

          तक्रारदार हे आजारी असल्याने ते वैद्यकीय रजेवरून हजर झाले नंतर त्यांचा पगार काढून देण्याचे मोबदल्यात आलोसे क्र.०१ श्रीमती वैशाली पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी, नाशिक यांनी दि.१५ मे रोजी १००००/-₹ लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले व आलोसे क्र.०२ संजय रामू राव, आरोग्य सेवक, हिवताप नाशिक यांनी दि.१५ मे रोजी १००००/-₹ लाचेची मागणी करून आज दि.१७  रोजी आलोसे क्र.०३ कैलास गंगाधर शिंदे, यांना स्वीकारण्यास सांगितले असता आलोसे क्र.०३ शिंदे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
        सापळा अधिकारी श्रीमती साधना इंगळे, पोलीस निरीक्षक, यांच्या सह सापळा पथक पो. हवा. सचिन गोसावी, पो. हवा. प्रफुल्ल माळी, पो. हवा. प्रकाश डोंगरे, यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !