तहसीलदार व खाजगी इसम २०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

तहसीलदार व खाजगी इसम २०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

   नासिक ::- आलोसे तहसीलदार विजय जबाजी बोरुडे, व खाजगी इसम गुरमीत सिंग दडियल, रा. कोपरगाव यांना २००००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

        तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता गुरुमीत दडीयाल याने आलोसे तहसीलदार विजय बोरुडेसाठी २०००० रुपयेची लाचेची मागणी करून नमूद लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तहसीलदार बोरूडे याने नमूद लाचेचे मागणीस प्रोत्साहन दिले असून लाचेची रक्कम दडीयाल याने  स्वीकारताना त्यांना पंच साक्षीदारा समक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. म्हणून आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
         सापळा अधिकारी संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक, सहसापळा अधिकारी वैशाली पाटील पोलीस उप अधीक्षक यांच्या सह सापळा पथक पो. ह. पंकज पळशीकर, पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रवीण महाजन, पो. ना प्रभाकर गवळी, चापोना संतोष गांगुर्डे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !