कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नासिक::- धुळे पंचायत समिती, धुळे येथील कनिष्ठ सहाय्यक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जाळ्यात. धुळे पंचायत समिती मधील बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ सहाय्यक शामकांत नानाभाऊ सोनवणे यास ३५०० ला स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार हे पंचायत समिती धुळे येथे शाखा अभियंता या पदावर कार्यरत असून ते एप्रिल २२ पर्यंत रत्नपुरा बीट येथे नेमणुकीस होते. सदर कालावधीतील बीटचे विभागीय लेखापरीक्षण झालेले होते. 

लेखापरीक्षण केलेल्या नावाने बक्षीस म्हणून कनिष्ठ सहाय्यक सोनवणे हे तक्रारदार यांच्याकडे वेळोवेळी भेटून अथवा मोबाईलवर संभाषण करून लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती. सदर रुपये ३५०० ची लाच स्वीकारताना आज त्यास पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले असून देवपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. कारवाई उपाधीक्षक अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक मंजित सिंग चव्हाण, सहकारी राजन कदम, भूषण खलाणेकर, शरद काटके, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, यांनी नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !