जिल्हा परिषद, नाशिक "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद झालेल्या पुरस्काराचे ऍड.उज्ज्वल निकम यांचे हस्ते वितरण !

जिल्हा परिषद, नाशिक "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद झालेल्या पुरस्काराचे ऍड.उज्ज्वल निकम यांचे हस्ते वितरण ! 

       नासिक::- महाराष्ट्र राज्याच्या जनतेस त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील जिल्हा परिषद या सर्वोच्च संस्थेच्या सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक सभांचे इतिवृत्त पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली आणि एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. या प्रकाशन उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या या विक्रमाची नोंद द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली होती. सदरच्या राष्ट्रीय स्तरावरील नोंदीच्या पुरस्कारांचे वितरण नाशिक येथील अधिवेशनात अखिल भारतीय प्रकाशक संघाच्या ४ थ्या लेखक प्रकाशक संमेलनात नामवंत विधिज्ञ ऍड. उज्वल निकम यांचे शुभहस्ते नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पोपट पिंगळे व संकलक जी. पी.खैरनार यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, स्वागताध्यक्ष विश्वास ठाकुर, जेष्ठ साहित्यिक प्रविण दवणे, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, संमेलनाध्यक्ष अशोक कोठावळे, विलास पोतदार, वसंत खैरनार व सुभाष सबनीस उपस्थित होते._ 

            नाशिक जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याची संकल्पना नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागात मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत असणारे जी.पी. खैरनार यांनी तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती पत्राद्वारे केली होती. नाशिक जिल्हा परिषदेने या वैविध्यपूर्ण उपक्रमास नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नियमित विषय घेऊन अभिनंदनासह मान्यता दिली होती. नाशिक जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपादकीय जबाबदारी घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त उपलब्ध करुन दिले होते. जी.पी. खैरनार यांनी सदर इतिवृत्त संकलित करुन जिल्हा परिषद नाशिक "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन पुस्तकाची बांधणी केली होती. प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन नाशिक जिल्हा परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेच्या दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ च्या सर्वसाधारण सभेत केले होते. नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पोपट पिंगळे यांनी संपादित केलेल्या व जी. पी.खैरनार यांनी संकलित केलेल्या या पुस्तकाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, प्रधान सचिव, ग्रामविकास सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सस्नेह पाठविल्या होत्या. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आनंदराव पिंगळे व जी. पी. खैरनार यांचे अभिनंदन करुन विशेष सत्कार केला होता.   

   
************************************
            नाशिक जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त जिल्हा परिषद, नाशिक "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन प्रसिद्ध केले. या उपक्रमाची नोंद दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय विक्रम व एशियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये सुद्धा राष्ट्रीय विक्रम म्हणून घेऊन नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव केला आहे. हा सन्मान तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व समस्त जिल्हा परिषदेच्या कर्मचारी यांचा हा सन्मान आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या या विक्रमाने नाव लौकिकात भर पडली आहे. सदर पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक येथील  चवथ्या अधिवेशनात जेष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्याबद्दल अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार !
       आनंदराव पोपट पिंगळे, संपादक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, नाशिक.
***********************************
     

नाशिक जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याची संधी नाशिक जिल्हा परिषदेने दिली त्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे विशेष आभार व्यक्त करतो. तसेच पुस्तक बांधणी कामी वैशाली प्रकाशन पुणे, टाईप सेटिंग साठी किरण गोरले, मुद्रनासाठी देवगिरी ऑफसेट, नाशिक यांचे अनमोल सहकार्य लाभले त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो.
        नाशिक जिल्हा परिषदेच्या अभिनव विक्रमाची नोंद दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय विक्रम व एशियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद घेतल्याबद्दल या संस्थांचे विशेष आभार व्यक्त करतो.
      या पुस्तकांतून भविष्यातील ग्रामीण तरुण पिढीस शासकीय मार्गदर्शक म्हणुन हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
         जी. पी.खैरनार, संकलक तथा मुख्य औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!