पोस्ट्स

न्यूज मसाला ३० जानेवारी २०२० अंक, निश्र्चयाचा महामेरू संजय देवरे अर्थात एसकेडी विशेषांक

इमेज

रेमिनी इसेंस 2020 पुनःर्भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
रेमिनी इसेंस 2020 पुनःर्भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!!      नासिक::-मोतीवाला होमिओपॅथिक मेडीकल काॅलेज मध्ये दि. २५/२६ जानेवारी रोजी माजी विद्यार्थ्याचा पुनःभेटीचा रंगतदार सोहळा महाविद्यालयाच्या आवारात संपन्न झाला.           देश विदेशातील माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचा स्वागत समारंभ २५ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात प्रार्थनेने झाली. मागील २५ बॅचेसचे माजी वर्गप्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी यांचे स्वागत व्यासपीठावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण व मार्गदर्शन प्राचार्य डाॅ.  एफ.एफ.मोतीवाला व मोतीवाला एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट च्या विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला यांनी केले, या प्रसंगी प्राचार्य डाॅ. एफ.एफ.मोतीवाला यांनी आपल्या भाषणात माजी विद्यार्थ्यांचे गौरवोदपर भाषण केलेे व त्या सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. त्याचप्रमाणे विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला यांनी सर्व विद्यार्थी हे महाविद्यालयाचे भूषण असल्याचे नमूद केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी समाजामध

प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय तर्फे एकदिवसीय संमेलनाचे आयोजन ! सेल्फ गव्हर्नन्स फाॅर गुड गव्हर्नन्स !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय तर्फे एकदिवसीय संमेलनाचे आयोजन     नासिक::-सेल्फ गव्हर्नन्स फॉर गुड गव्हर्नन्स या विषायान्वये येशील ब्रह्माकुमारी शाखे तफं दिनांक: २५ जाने २०२० शनिवारी सकाळी ९.३० ते सांय ६.३० वाजे पर्यत एकदिवसीय संमेलनाचे आयोजन जुना गंगापुर नाका शंकाराचार्य न्यास येथे आयोजित करण्यात आले आहे या संमेलनासाठी खास दिल्ली येथुन ब्रह्माकुमारी संस्थेच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारीज् प्रशासाकिय विंगच्या राष्ट्रीय संयोजिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी आशादिदीजी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असणार आहे समाजाचा कारभार सुयोग्यरित्या चालविण्यासाठी स्वतः ला कसे परिपक्व बनवावे स्वराज्य द्वारे सुराज्य कसे आमलात आणावे या विषयीचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिदी राजयोग माध्यमातून देणार आहेत या सोबतच प्रशासकीय वर्गासाठी अध्यात्म व ध्यानसाधनेचे महत्वा आपल्या अंतरंगातील स्त्रोतांचा वेध कसा घ्यावा, सुशासन करतांना सत्यता व स्पष्टता कशी राखावी, मानवी संवेदना व सहदय शासन कसे करावे, सुशासनाचे क्रियान्वयन कसे करावे इत्यादि विषयांवर दिवसभराच्या दोन सत्रांमधून प्रकाश टाकण

NEWS MASALA 23 rd January 2020 issue

इमेज
न्यूज मसाला-- २३ जानेवारी २०२० चा अंक

रेमिनी इसेंस अर्थात गत आठवणींना उजाळा - २०२० या पुर्न:भेट सोहळ्याचे आयोजन ! मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा रंगतदार कार्यक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
रेमिनी इसेंस (गत आठवणींना उजाळा २०२०) - मोतीवाला होमिओपॅथिक मेडीकल काॅलेजमध्ये पुनःभेटीच्या सोहळयाचे रंगतदार आयोजन !            नासिक::- दि. २५ व २६ जानेवारी २०२० रोजी मोतीवाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील २५ वर्षापासून आजपर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुन:भेटीच्या रंगतदार सोहळयाचे आयोजन महाविद्यालयाच्या आवारात आयोजित केला आहे. यापुर्वी २०१५ मध्ये अशाच प्रकारचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांचा उदंड उत्साह पाहून दर पाच वर्षांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी इच्छा प्राचार्य डाॅ. एफ. एफ. मोतीवाला यांनी व्यक्त केली होती. या महाविद्यालयातून ज्ञानार्जन करुन आपआपल्या निजी जीवनात स्थिर स्थावर झाालेल्या मित्रांची भेट घडवून आणणे,  त्यांच्याशी हितगुज साधणे व महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांशी संवाद साधून महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सोहळयाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.            मोतीवाला काॅलेजची स्थापना सन १९८९ मध्ये झााली. स्थापना वर्षापासून चे विद्यार्थी या सोहळयात सहभागी होणार आहेत. प्राचार्य डाॅ. एफ. एफ

मुंबई नाका पोलिस ठाण्यातर्फे रेझींग डे साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

इमेज
       ना सिक::- २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान आला होता, त्याच दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २ जानेवारी ला रेझींग डे साजरा केला जातो त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई नाका पोलिस ठाण्यांतर्गत न्यू इरा स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.          न्यू इरा स्कूल गोविंद नगर या ठिकाणी मुंबई नाका पोलीस स्टेशन तर्फे पोलीस रेझिंग डे २०२० निमित्त  वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर वकृत्व  स्पर्धे  मध्ये मनपा शाळा, रमाबाई शाळा ,अशोका स्कूल, सिक्रेट हार्ट,उर्दू स्कूल, रेहनुमा स्कूल अशा ९ शाळा मधील ४५ विध्यार्थ्यांनी सदर स्पर्धे मध्ये सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमासाठी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ १ चे सहा पोलीस आयुक्त , विभाग २ चे अधिकारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच परीक्षक म्हणून बाल न्यायमंडळाचे श्रीम. शोभा पवार, भ्रमर चे संपादक चंदूलाल शाह , सिम्बॉसिस स्कूल चे विश्वस्त पाटील सर यांनी कामकाज करून  कार्यक्रमाची शोभा वाढविली .

८ जानेवारीच्या देशव्यापी संपाचे निवेदन जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ...! संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे आवाहन तर संपात उतरणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले !! दोन्ही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
८ जानेवारीच्या देशव्यापी संपात जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, कंत्राटी व  किमान वेतन कर्मचारी होणार सहभागी याबाबत चे निवेदन जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ...         नासिक::- देशभरातील महागाई , आर्थिक मंदी, बेरोजगारी, कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल ,  खाजगीकरण कंत्राटी करण, आणि जन विरोधी धोरणामुळे केंद्र सरकार विरोधी देशभरातील केंद्रीय ट्रेड युनियन व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा विविध, अखिल भारतीय कामगार कर्मचारी, असंघटित कामगार, कंत्राटी कामगार, किमान वेतन कर्मचारी, श्रमिक - शेतकरी या संघटनांचेे देशात २ कोटी औद्योगीक कामगार - कर्मचारी, श्रमीक वर्ग  ८ जानेवारी २०२० ला आपल्या मागण्यांकरीता एक दिवसाच्या देशव्यापी संपात सहभागी होत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, पेट्रोल , डिझेल, घरगुती गॅस व इतर जिवनावश्यक वस्तूवरील दर नियंत्रनात आणा, अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून तात्काळ मदत द्या. स्वामीनाथन आयोग लागु करा, औषधे, खते, बियाणे यांच्या किंमती नियंत्र

भुजबळ म्हटलं की राजकीय, सामाजिक, व प्रशासनात 'जान' कशी आणी कुठून येते ? संजय राऊत दोन जानेवारीला कसा 'च' लावणार !! होऊ घातलेल्या दिमाखदार वास्तुच्या भूमीपूजनाचा एक राजकीय 'डाव' खालील लिंकवर क्लिक करून वाचा !!!

इमेज
" जिल्हा परिषद नवीन वास्तू भुमीपूजन स्थळावरून न्यूज मसाला !" "लोहा गरम है, मारो हातोडा"      नासिक::- येत्या ३० तारखेला खोळंबलेला मंत्रीमंडळ विस्तार होत आहे तत्पूर्वी प्रस्तावित जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पार पाडण्यात आले. ग्रामविकास खात्याचा पदभार ना. छगन भुजबळांकडे आहे व तो कायम राहील की नाही हे लवकरच कळेल. त्या आधी भुजबळांनी अशी आलेली संधी सोडली ! असं शक्य नाही हे सर्वश्रुत आहे, अवघ्या दोन दिवसांत सारी राजकीय, प्रशासकीय यंत्रणा कामाला जुंपून भुमीपूजनाचा बार उडवून आपल्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. भुजबळ म्हटलं की राजकीय, सामाजिक, प्रशासनात नवी "जान" कशी आणी कुठून येते हे स्व:ता भुजबळंनाही शोधून सापडणार नाही पण परिस्थिती तशी आपसूकच निर्माण होते. "अशा वेळी जर "लोहा गरम है तो हातोडा मारणें मे " कोण उशीर करेल"       या गडबडीत प्रशासनाने मोठमोठे फलक लावले, फलकावर काय लिहिले हे तपासायला ही वेळ मिळू नये ईतक्या घाईघाईने कार्यक्रम उरकला हा त्याचाच पुरावा समजावा काय हे त्याचे उदाहरण !      फलकावरी

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप... मा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ...         नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे, केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय  ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्य

समाजातील दिव्यांगांच्या उत्कर्षासाठीच्या शिवाश्रम चे २५ डिसेंबर ला लोकार्पण ! राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या स्वप्नातील आश्रमाची डॉ. विजय तनपुरे करीत आहेत स्वप्नपूर्ती !! अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आयोजकांकडून आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
२५ डिसेंबरला शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा. विविध क्षेत्रातील मान्यवर लावणार उपस्थिती.          नासिक::- महाराष्ट्राचे वैभव, अहमदनगर जिल्ह्यातील व राहुरी नगरीचे भुमिपुत्र असलेले, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय किर्तीचे विश्वशिवशाहिर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्र परिसरात निर्माण करण्यात आलेल्या शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा येत्या २५ डिसेंबरला संपन्न होणार आहे. शिवाश्रमासाठी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे केंद्राध्यक्ष मधुकर गीते व त्यांच्या कुटुंबीयांनी ५० गुंठे जमीन विनामूल्य दान करून अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधीत या जागेवर ४२०० चौरस फूट आकाराची भव्यदिव्य शिवाश्रम इमारतीची उभारणी झाली आहे. शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी त्यांच्या पोवाड्याच्या त्याचबरोबर किर्तन व्याख्यान आदी कार्यक्रमातून जमा झालेले मानधन शिवाश्रमासाठी तसेच आईने शिवाश्रमासाठी जमा करून ठेवलेले एक लाख रुपये तसेच महाराष्ट्रातील विविध दानशूरांनी यथाशक्ती वस्तू व आर्थिक स्वरुपात मदत केली. या सर्वांच्या सहका