हार न माणणाऱ्या पोलीस अधिकारी व जिद्दी पत्रकाराची सत्याचा शोध घेणारी निर्व्याज प्रेम व निखळ मैत्रीची कथा ! अलिदा !! चंदा तलवारेंचा सत्कार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिकच्या प्रख्यात लेखिका चंद्रा रमेश तलवारे यांच्या अलिदा या इंग्रजी कादंबरीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जयपूर लिटररी फेस्टिव्हलमध्ये प्रकाशनाचा मान मिळाला आहे.जयपूर बुकमार्क तर्फे अशा प्रकारचा सन्मान मिळणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या लेखिका आहेत त्यांचा नासिक मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      जयपूर लिटररी फेस्टिव्हल  २४ ते २८ जानेवारी या कालावधीत होत असून चंदा तलवारे यांना विशेष निमंत्रित करून २६ जानेवारीला त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. आस्ट्रेलिया येथील मेलबर्न लिटरेचर हे या सोहऴ्याचे सहभागीदार आहेत.
       हार न मानणाऱ्या पोलीस अधिकारी व एका जिद्दी पत्रकाराची सत्याचा शोध घेणारी निर्व्याज प्रेम व निखळ मैत्रीची कथा आहे,  महोतत्सवात २०१८ मधील यशस्वी कथा म्हणून "अलिदा" ची आयोजकांच्या टीमवर्क आर्टतर्फे निवड करण्यात आली आहे. अँमेझानवर दोन आठवड्यातच विक्रीच्या टाँप फाईव्ह थाऊजंड मध्ये अलिदाने स्थान मिळविले आहे. संमेलनात २५० नावाजलेले वक्ते व लाखापेक्षा जास्त श्रोते यांची वर्णी लागणार असुन या पाच दिवसांच्या महोत्सवात चंदा तलवारे यांच्या कादंबरीला टाँप ट्वेंटीत स्थान प्राप्त केल्याने मान्यवरांसमोर हि कथा समोर आणण्याची संधी मिळाली आहे.
चंदा तलवारे यांचे साहित्यिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत असून नासिक मनपातील सत्कारावेळी रमेश तलवारे ,प्रवीण तलवारे आर. टी. फुलदेवरे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।