१६ व १७ जानेवारीला निर्धार परीवर्तनाचा यात्रा जिल्ह्यात येत असुन यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक दि. ११ (प्रतिनिधी):- येत्या १६ व १७ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यात येणारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रा यशस्वी करा असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
       नाशिक जिल्ह्यात दि. १६ व १७ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे घेण्यात आली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ बोलत होते.
        शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न व समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील जनतेपर्यंत ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन परिवर्तन यात्रा काढत आहे. येत्या दि.१६ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यात सिन्नर, घोटी, ता.इगतपुरी व नाशिक शहरात तर दि. १७ जानेवारी रोजी दिंडोरी, सायखेडा, ता.निफाड व मनमाड, ता. नांदगाव येथे होणाऱ्या यात्रेत प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ, आ.अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा.सुप्रिया सुळे, आ.दिलीप वळसे पाटील, आ.सुनिल तटकरे, आ.जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
या बैठकीत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनतेच्या हिताच्या दृष्टीने विविध ठराव संमत करण्यात आले.

**कांद्याला किमान २ हजार रुपये हमीभाव द्या.
**शेतपंपाची वीज बिले १०० टक्के माफ करा.
**सक्तीची कर्ज वसुली बंद करा.
** शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करा.
**शेतीवरचे भारनियमन रद्द करा.
**शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदतीचे पॅकेज द्या

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली.यावेळी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!