धडाका !! ग्रामसेवक सेवेतून निलंबित !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

          नाशिक – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी नोव्हेंबर १८ मध्ये दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीस भेट दिली होती. यावेळी तपासणीसाठी ग्रामपंचायत दप्तराची मागणी केली होती. मात्र दोन दिवसात दप्तर तपासणीसाठी सादर करतो अशी विनंती करून अद्यापपावेतो दप्तर सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकास जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नोव्हेबर महिन्यात दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीस भेट दिली होती. यावेळी त्यांनी तपासणीसाठी ग्रामपंचायत दप्तराची मागणी केली मात्र तब्बेत ठीक नसल्याचे कारण देत दोन दिवसात दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून देतो अशी विनंती केली होती. मात्र मुदत देवूनही तपासणीसाठी दप्तर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तळेगाव दिंडोरी येथील ग्रामसेवक संदीपान नेटके यांना कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न करणे या कारणांमुळे जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।