शहर-ए-खतीब अलहाज हुसामूद्दीन अशरफी यांच्याकडून जनतेस सद्वविवेकपणे मतदान करण्याचे आवाहन ! कोणत्याही राजकीय पक्षाला वा उमेदवाराला पाठिंब्याचा प्रश्न नाही !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

शहर-ए-खतीब यांच्याकडून जनतेस आवाहन !
नासिक ::- शहर-ए-खतीब हे मुस्लीम समुदायाचे सेवक म्हणून कार्य करीत असतात, त्यामुळे राजकीय निवडणुकीत या पदाचा काहीएक संबध  नसतो, त्याचप्रमाने आम्ही कोणत्याही राजकीय पक्षासोबत  कधीच नव्हतो, आजही नाही, आणी भविष्यातही राहणार नाही, आम्ही फक्त आणी फक्त समाजाचे सेवक या नात्याने कार्यरत असतो, मात्र सध्या होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमधील निवडणुकीसाठी असलेले बहुतेक उमेदवार आमच्या सदीच्छा व आशिर्वादपर भेटीसाठी येतात याचा अर्थ आम्ही एखाद्या राजकीय पक्षासोबत आहोत असे समजणे गैर आहे. भेटीचा विषय कुण्या राजकीय पक्षाबरोबर वा राजकीय व्यक्तीसोबत जोडून जनतेत चुकीचा संदेश पाठविला जात असेल तर अशा अफवांना समाजाने बळी पडू नये, लक्ष देऊ नये, आपल्या लोकशाही मुल्यांचा हक्क अबाधित ठेऊन सद्विवेक बुद्धीने अंतरात्म्याचा आवाज सांगेल त्या उमेदवाराला मतदान करा. लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा,  भारतीय नागरिक आहोत तर महत्वपूर्ण तथा गंभीरतेने मतदानाचे कार्य प्रत्येकाने पूर्ण करावे, असे आवाहन नासिक शहर-ए-खतीब अलहाज हुसामूद्दीन अशरफी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पण्या

  1. आज परियांत मुस्लिम समाजासाठी कोणत्याही शासनानी व नेत्यांनी काही करेल नाही तर मुस्लिम समाज फक्त आपल्या मना नुसार मतदान वजूणार कोणत्याही पक्षाला पाठिंबा ना देता
    आपला,छावा संघटना मुस्लिम आघाडी प्रदेश अध्य्क्ष राशिद भाई सैय्यद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)