आमदार दिलीपराव बनकरांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी २ कोटी मंजूर... सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
आमदार दिलीपराव बनकरांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी २ कोटी मंजूर...
         नासिक::-निफाड तालुक्यातील विकास कामांचा झंझावात आमदार दिलीपराव बनकर यांनी कोरोनाच्या या वैश्चिक  संकटातही सुरूच ठेवल्याने निफाड शहराच्या पाच कोटी निधी नंतर तालुक्यातील रस्ते  व सभामंडप यासाठी सन  २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा (२५१५) पुरविणे अंतर्गत निफाड विधानसभा मतदार संघातील रु.२ कोटीची खालील विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याचे आमदार दिलीपराव बनकर यांनी माहिती दिली. यामध्ये १) पिंपळगांव बसवंत येथे पाचोरे वणी हायवेलगत शिवरस्त्याची सुधारणा करणे. (रु.३ लक्ष) २) रामा ते पिंपळगांव जॅकवेल रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५ लक्ष) ३) पिंपळगांव बसवंत येथील शिवाजीनगर अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे. (रु.२५ लक्ष) ४) पिंपळगांव बसवंत ते जुना शिरसगांव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.५ लक्ष) ५) पाचोरे वणी येथील प्रताप नागरे ते प्रकाश नागरे व दिलीप वाळुंज रस्ता करणे. (रु.१० लक्ष) ६) सावरगांव येथील बेघर वस्तीमध्ये सभामंडपाचे बांधकाम करणे. (रु.१५ लक्ष) ७) दावचवाड़ी येथील मनकर्णिका नदीलगतच्या गावापासून ते शांताराम देवराम शिंदे यांच्या वस्तीपर्यंत रस्त्याची सुधारणा करणे. (रु.५ लक्ष) ८) नांदुर्डी येथील जाधव वस्ती ते धोड़बा रस्त्याची सुधारणा करणे. (रु.५ लक्ष) ९) शिवरे ते दत्त मंदिर, गंगाधर वाघ वस्ती रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५ लक्ष) १०) कोठुरे रसलपुर शिवरस्ता (हायस्कूल ते भालेराव कोल्ड स्टोअरेज) रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५ लक्ष) ११) जिव्हाळे ते शिरसगांव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.२५ लक्ष) १२) मौजे सुकेणे येथील चारी न.१६ रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१० लक्ष) १३) साकोरे मिग येथील वॉटर सप्लाय रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१२ लक्ष) १४) चाटोरी ते जुनी सिन्नर वाट रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१० लक्ष) १५) चितेगांव येथील रानमळा रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५ लक्ष) १६) शिंपीटाकळी ते रामजी लोखंडे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१० लक्ष) १७) मांजरगांव येथे सभामंड़प बांधणे. (रु.५ लक्ष)हित्यादी कामाचा समावेश करण्यात आला आहे  ही कामे मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ़, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य लाभले असून कामे मंजूर केल्याबद्दल आमदार दिलीपराव बनकर यांनी त्यांचे आभार मानले.
****************************************
प्रतिक्रिया
दिलीपराव बनकर आमदार निफाड
निफाड तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दुसऱ्यांदा विश्र्वास दाखविला त्यास तडा जाऊ न देता तालुक्यातील गेलेले गतवैभव परत मिळवून देण्यासाठी दिलीप बनकर हा कायम विकासाचा अश्वमेध सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध राहील, विकासच करून नाही तर सर्वांगीण विकासासाठी माझा प्रयत्न राहील, त्यासाठी मूलभूत सुविधा जसे वीज ,पाणी, रस्ते ,आरोग्य, शिक्षण, याच बरोबर तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत आणणे, शेतीवर आधारित  प्रक्रिया उद्योग सुरू करणे यात द्राक्ष ,कांदा ,टोमॅटो, ऊस, याबरोबर तालुक्यातील बंद पडलेले साखर कारखाने व नवनवीन उद्योग काढण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  मंत्रिमंडळातील सन्माननीय मंत्री आदींच्या मार्गदर्शनाखाली निफाड तालुक्यात कोरोनाच्या या वैश्विक महामारीत ते महामारी तून बाहेर पडल्यानंतर विकासाचा अश्वमेध परत नव्या जोमाने सुरू करून तालुक्याला विकासाचं मॉडेल रुपी तालुका म्हणून राज्यात करण्याचा माझा मानस राहील.

टिप्पण्या

  1. आजपर्यंत आल्या गेल्या सर्व आमदार सरांकडून बेरवाडी ते सायखेडा या रस्त्याची साधी डागडुजी देखील झालेली नाही, या रखडलेल्या रस्त्याचा विचार न होता त्याची अंबलबजावणी करत लवकर प्रश्न मार्गी लावावा ही नवनिर्वाचित आमदार यांना मागणी..

    उत्तर द्याहटवा
  2. आपले आ दिलीप काका बनकर यानी अश्वासन दिले होते की मि आमदार झाल्यावर रस्ता करून देईन अता त्यांनी आपल्या सायखेडा व बेरवाडी रस्ता करून दयावा हि अम्हा गावकरयाची मागणी व विनंती आहे कारण रस्त्यामुळे गावात बस येत नाही त्यामूळे काॅलेज मधिल मूला मूलिंना वेळेत जाता येत नाही व अर्जंट पेशंट नेने कठीण होते गाडया चालवने कठीण होतात त्यामूळे त्यानी रस्ता लवकरात लवकर चांगल्या प्रतिचा करून दयावा ही नम्र विनंती आहे 👏👏👏👏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव