नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन
नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन नाशिक : कर्मवीरांच्या त्यागातून आणि अनेक समाजधुरीणांच्या अविरत परिश्रमातून ११२ वर्षांपूर्वी उभी राहिलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज या संस्था आज राज्यातली एक अग्रणी आणि सर्वात मोठी म्हणून या संस्थेकडे पहिले जाते. अवघ्या पाच विद्यार्थ्यापासून सुरु झालेली संस्था आज दोन लाखांहून अधिक विद्यार्थी, ११ हजारांहून अधिक शिक्षक, मोठा कर्मचारी वर्ग अशा पद्धतीने मविप्रचे एका मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. नाशिक जिल्ह्यात आज इतका मोठा विस्तार या संस्थेने उभा केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मविप्र संस्थेचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील १२८ एकरांच्या विस्तीर्ण परिसरासह अत्याधुनिक सुविधांनीयुक्त कर्मयोगी द...