पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यातील एकही मुल कुपोषित व ग्राम बाल विकास केंद्रातील आहार तसेच उपचारापासुन वंचित राहणार नाही-अनिल लांडगे. सहाय्यक प्रशासनाधिकाऱ्यास सेवानिव्रुत्तीच्या दिवशीच निव्रुत्तीवेतन दाखला सुपूर्त !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
           नाशिक(३०)::- जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ नरेश गिते यांनी जिल्ह्यात जोरदार काम सुरु केले आहे. महिला व बालविकास. आरोग्य व ग्रामपंचायत विभाग यासाठी एकत्रितपणे काम करीत आहेत. जिल्ह्यातील एकही मुल कुपोषित राहणार नाही व ग्राम बाल विकास केंद्रातून आहार व उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे व आवश्यक तेथे गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांनी पुन्हा पुन्हा सर्वेक्षण करून कुपोषित बालक शोधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी केले.            नाशिक व दिंडोरी तालुक्याची एकत्रित आढावा बैठक आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सभागृहात  जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.           यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ डेकाटे , सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बाल विकास विभागाचे उप मुख्य कार

कोण म्हणते, मराठा जातीयवादी आहे !! थोडक्यांत मांडलेल्या विचारांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कोण म्हणते , मराठा जातीयवादी आहे, विचारून तर बघा एकदा नवनिर्वाचित आमदार दराडे बंधूंना, व शिवसेनेला ! किती मते होती वंजारी समाजाची, याचा अभ्यास करा ? पैसे जे, निवडणुकीत वाटले जायला नकोत या मताचा मी पण आहे, पण कोणी एकानेच वाटलेत की अनेक उमेदवारांनी ? मग फक्त दराडे व विकले गेलेले मराठाच दोषी आहेत का ? बोटावर मोजण्या इतकी वंजारी समाजाची मते असतांना मराठा समाजाने दरांडेंना मतदान केले व दोन्ही बंधू निवडून आलेत यां विजयांतील सर्वात मोठा वाटा मराठा समाजाचा आहे, हे कुणीही नाकारू शकत नसतांना विनाकारण मराठा समाज जातीयवादी आहे अशी बदनामी का होतेय ?  हाकाटी पिटविणाऱ्यांनो जर खरोखर मराठा समाज जातीयवादी असता वा तसा वागला असता तर निवडणुकीचा निकाल काय असता ? याचा विचार करा !! सकल मराठा समाज एक आहे पण जातीयवादी राजकारणापासुन कोसो दूर आहे नासिक  मतदार संघातील दोन्ही विधानपरिषद निवडणुक निकालावरून स्पष्ट होत असतांना विनाकारण बदनामी का केली जातेय ? या मागील षडयंत्राचा  अभ्यास करणे हा यामागील मुळ मुद्दा ठरू शकतो , त्याचा अभ्यास ज्यांना गरज आहे ते करतीलही, तुर्तास जातीयवादाला पसरवू नका, फक्त नासिक जिल्ह

डाँक्टर, अँम्ब्युलन्स, औषधे, पाण्याचे टँकर आदी सुविधा निव्रुत्तीनाथ पायी दिंडीसाठी सालाबादाप्रमाणे छावा क्रांतीवीर सेनेकडून सेवेच्या माध्यमातून पुरविल्या जाणार-गायकर,संस्थापक अध्यक्ष, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!,

इमेज
       नासिक(२९)::-  संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा २०१८ या सोहळ्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने दिंडी सोहळ्यासाठी डॉक्टर,अँबुलन्स ,औषधें ,पिण्याचे पाणी टँकर,सेवेकरी आदी सोयीयुक्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी त्रंबकेश्वर ते पंढरपूर आणि पुन्हा परतीचा प्रवास पंढरपूर ते नाशिक सदर सेवा परमपूज्य स्वर्गीय भय्युजी महाराज व आमचे श्रध्दास्थान स्वर्गीय आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मरणार्थ ही सेवा देत असून पुढे देखील अशीच अविरतपणे सुरू राहील असा संकल्प आयोजकांनी केला आहे. यापुढेहीआम्ही सदर नियोजन सालाबादाप्रमाणे करत राहणार आहाेत. दिंडी सोहळ्यासाठी कुठलीही सेवा कमी पडल्यास ती देण्यास आम्ही तत्पर राहू.यावेळी अँबुलन्स चे उदघाटन ह.  भ. प. भागवताचार्य संतोषा नंदगिरीजी महाराज , संस्थापक अध्यक्ष करण गायकर ,पाणी टँकरचे उदघाटन माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष संपत नाना सकाळे,शिवाजी सहाणे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती.किशोरजी घाटे ,राजाभाऊ तेलंग ,दत्ताकाका गडाख ,.खंडेराव दातीर ,निवृत्ती शिंदे ,डॉ राजेंद्र शिंदे ,डॉ राजेंद्र पाटील ,डॉ वैभव पाटील ,एस आर सातपुते ,शिंपी त

आयुक्तांच्या कार्यशैलीच्या विरोधी भूमिका सहाय्यक आयुक्तांकडून घेतली जात आहे का, असा प्रश्न नासिकरांकडून उपस्थित केला जात आहे, !! सविस्तर प्रश्न जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
               नासिक पोलीस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंघल यांची आजपर्यंतची कार्यपद्धती हि नासिककरांच्या अंगवळणी पडली व कौतुकही होत आहे , ती सामाजिक पोलीसींग च्या माध्यमांतून राबविलेल्या उपक्रमांची. तिचे नासिककर मनापासुन स्वागत करीत आहेत. याऊलट शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नासिककरांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.       शहर वाहतूक शाखेचे चार विभाग केले आहेत, वाहने टोईंग करणे विभाग एकमध्ये केले जात आहे, कारण टोईंग केलेल्या वाहनांना जमा करण्यासाठी इतर तीन विभागांत जागा नाही व ती लवकरांत लवकर उपलब्ध करण्याचे त्यांनी जाहीर केले.             यासंदर्भात शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना मनपाच्या महासभेस उपस्थित रहावे लागते, तसेच वेळोवेळीही त्यांचा मनपाशी कायम संपर्क असतो तरीही त्यांनी मनपाशी पार्कींग झोनबाबत यंयुक्तपणे प्रयत्न करण्याऐवजी फक्त ठेकेदाराचं कल्याण व नासिकरांना दंडाचा भुर्दंड , याचाच विचार केलेला दिसतो, यासंदर्भात नागरिकांनी नासिक पोलीस आयुक्त डाँ रविंद्रकुमार सिंघल ज्या पद्धतीने काम करीत आहेत तशीच अपेक्षा शहर वाहतूक शाखेकडून अपेक्षित आहे असे

युट्युबवर HARMONISA शब्द टाका आणी म्युझिक बँडचे अफलातून गाणं समोर !! जागतिक संगीत दिनाची आठ शिष्यांकडून पं.सुरेश वाडकरांना विशेष भेट !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पं. सुरेश वाडकरांच्या आठ शिष्यांची गुरूंना जागतिक संगीत दिनानिमित्त विशेष भेट ! 'हरिभाऊ विश्वनाथ कंपनी’च्या उदय दिवाणे यांच्या सहकार्यातून Harmoनिसां"  म्युझिक बँडचं *'Melody Melange' गाणे साकार! "Harmoनिसां" म्युझिक बँडचं 'Melody Melange'  हे गाणं नुकतंच जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून YouTube वर प्रसारित करण्यात आलं आहे. प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते प्रकाशित झालेली ही काहीशी हटके असलेली संगीतकृती अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. राग *किरवाणी* वर आधारित तीन भिन्न प्रकृतीच्या गीतांचा हा समन्वय आहे. 'मुकुटवारो सांवरो' ही शास्त्रीय बंदिश, 'ओ माय लव्ह' हे पाश्चात्य धाटणीचं नवीन इंग्रजी गीत आणि 'दिल की तपिश' हे कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सिनेगीत असा त्रिवेणी संगम आपल्याला यात ऐकायला मिळतो. कधी सरगम, तर कधी वेस्टर्न म्युझिकचे पीसेस वापरून ही गाणी कौशल्यपूर्ण रीतीने जोडली गेल्याने त्यांचा एकसंध अनुभव मिळतो. आल्हाददायक निसर्गाच्या सान्निध्यात रोहिता मोरे आणि प्रथमेश रांगोळे यांनी चित्रीकरण केलेला व्हिडी

पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अजित ताडगे, उपाध्यक्षपदी संजय हेंडगे यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पंडित दीनदयाळ उपाध्याय ना.स.पतसंस्था चेअरमनपदी अजित ताडगे,व्हा.चेअरमन संजय हेंगडे यांची निवड.   नासिक(२८)::-मखमलाबाद येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन निवडणूक प्राधिकरण व सहकार विभागाच्या अधिकारी श्रीमती.एस.पी.शिंदे यांनी कामकाज पाहिले.सदर पतसंस्थेची संचालक मंडळ निवडणूक दि.४ जुन रोजी बिनविरोध झाली होती.चेअरमन,व्हा. चेअरमन निवडणूक कार्यक्रम दि.२८ जुन रोजी जाहिर केला होता. त्यानुसार चेअरमन म्हणुन अजित ताडगे यांचा एकमेव अर्ज होता.त्यास सुचक म्हणुन यशवंत ग पिंगळे तर अनुमोदक चित्रा तांदळे हे होते. त्यानुसार निवडणूक अधिकारी श्रीमती एस.पी.शिंदे यांनी अजित ताडगे यांची चेअरमन तर संजय हेंगडे यांची व्हा.चेअरमन म्हणुन निवड झाल्याचे जाहिर केले.मा.का.संचालक म्हणुन खंडेराव आव्हाड, जनसंपर्क संचालक राजेंद्र बोराडे, संचालक अमित घुगे, अवधुत गायकवाड,यशवंत ग पिंगळे, कैलास वा काकड, शांताराम साळवे,चित्रा तांदळे,लता केदार यांची निवड झाली. संस्थेच्या आजमितीस ६७ लाख ४१ हजार ठेवी आहेत.संस्थेने विज बिल भरणा केंद्र सुरु केले असुन ठेवीदार

महाराष्ट्रातील पोट खराबा जमीनींचे शुल्क भरून लागवडीसाठी ग्राह्य धरण्याच्या मागणीला यश-छावा क्रांतीवीर सेना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    पोट खराबा प्रश्न लागला मार्गी.छावा क्रांतिवीर सेनेच्या पाठपुराव्याला आले यश.        नासिक::- १५ जुलै पासून जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्ताव सादर करून नियमानुसार शुल्क भरून पोट खराबा जमिनी आता लागवडीसाठी योग्य ग्राह्य धरण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष - करण गायकर, उमेश शिंदे सर ,प्रदेश अध्यक्ष -छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेना,, तानाजी गायकर नवनाथ रिकामे आदींनी वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन ,प्रसिद्धी माध्यमातून पाठपुरावा केला होता.या मागणीला उचलुन धरत नाम.चंद्रकांत पाटील महसूलमंत्री महाराष्ट्र यांना शिष्टमंडळाने करण गायकर यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी बैठकीत हा निर्णय घेणे किती गरजेचे आहे हे निदर्शनास आणून दिले होते त्यामुळे सदर पोटखराबा जमिनीचा विषय मार्गी लावण्यात छावा क्रांतिवीर सेनेला यश आले आहे याचा फायदा महाराष्टातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे .त्यामुळे बुधवार दि.२७ जुलै २०१८ रोजी चंद्रकांत  पाटील यांच्या मुबंई येथील निवासस्थानी शेतकरी प्रतिनिधी सह त्यांचा सत्कार करून आभार मानन्यात

गुरूजींचा बे एके बे २७ जुलैला येतोय !! शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारी आव्हानात्मक भुमिकेत संजय खापरे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा, दीनानाथ यांचेकडून खास न्यूज मसालाच्या वाचकांसाठी !!

इमेज
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ] ‘बे एके बे’मध्ये संजय खापरेंनी साकारले गुरूजी                   काही मराठी कलाकारांनी हिंदीतही आपला ठसा उमटवत भारतीय सिनेसृष्टी गाजवली आहे. मराठमोळे अभिनेते संजय खापरे यांनीही मराठीसह हिंदीत साकारलेल्या भूमिकांचं सर्वांनीच कौतुक केलं आहे. आजवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य देणारे संजय खापरे आता ‘बे एके बे’ या आगामी मराठी सिनेमात गुरूजींच्या भूमिकेत दिसणार असून  येत्या २७ जुलै रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.                  शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करत समाजातील सत्य परिस्थितीवर बोट ठेवणाऱ्या ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ - यादव यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या बॅनरखाली केली आहे. हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा आणि अनिता महेश्वरी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते असून प्रविण गरजे आणि चिंतामणी पंडित हे सहनिर्माते आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन संचित यादव यांनी केलं असून कथा आणि पटकथा लेखनही त्यांनीच केलं आहे. या सिनेमातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी याद

अखिल भारतीय समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे संपन्न ! सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभर दौरे करणार-छगन भुजबळ, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिष देची  राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे संपन्न !           मुंबई, दि.२४:- बहुजन समाजातील लोकांनी नाशिक सह राज्यभरात विविध मोर्चे काढले या मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व जाती धर्मातील व विविध राजकीय पक्ष संघटना सहभागी झाले होते. या सर्व मोर्चेकऱ्यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आभार व्यक्त केले.यावेळी सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रभर  दौरे करावे अशी उपस्थितांनी साद घातली. यावेळी आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दौरे करणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.             आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्य कार्यकारिणी बैठक मुंबई येथे समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.                 यावेळी माजी खासदार समीर भुजबळ,आ.पंकज भुजबळ,समता परिषदेचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कुशवाह,उपाध्यक्ष बापू भुजबळ, प्रा.