खास.छत्रपती युवराज संभाजी राजेंचा धाडसी निर्णय-योेगेश केदार.

संभाजी राजेंचा धाडसी निर्णय...!

     नाथू ला(गंगटोक,१जून)::-काल पहाटे ४:३० वाजता उठून नाथू ला या भारत चीन च्या सीमेवर जायला निघालो . गंगटोक मधुन पुढे सीमेकडे जाताना मधेच वाटेत आर्टीलरी रेजिमेंट चा कैंप लागतो . तिथे आर्मी कडून ब्रीफ़िंग होती . जवळपास दहा ते बारा हजार फुटावरती हा कैंप आहे . चीन आणि भारतामधील सैन्याची सध्यस्थिति बाबत इथेच माहिती देण्यात आली . तीथे पोचल्यानंतर सर्व खासदारांची शारीरिक तपासणी करण्यात आली . यामध्ये एक अनपेक्षित बाब समोर आली . राजेंचा ब्लडप्रेशर अत्यंत वाढला असल्याच निदर्शनात आले . डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली .  राजेंना परत खाली गंगटोक ला जाण्याचा सल्ला दिला .
आपण जेवढे जास्त उंचीवर जाल तेवढा अजून ब्लड प्रेशर वाढेल .
नाथूला च्या चौकीची ऊंची पंधरा हजार फूट आहे. तीथे ऑक्सीजन ची पातळी आणखी कमी होईल . मी आपल्याला परवानगी देऊ शकत नाही. . राजेंनी डॉक्टरला विनंती केली तुमच्याकडे काही औषध वगेरे आहे का ? एखादी गोळी असेल तर द्या. डॉक्टर म्हणाले अशा स्थितीत मी आपल्याला गोळी खाऊन पुढच्या प्रवासाला  जायची परवानगी  देऊ शकत नाही . राजे म्हणाले , हे बघा मी इथे आपल्या सैन्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलोय . किती विपरीत परिस्थितीत काम करत आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायची माझी इच्छा आहे.   आणि कॉन्फरेंस रूम मधे ब्रीफ़िंग साठी निघाले . त्यानंतर मीटिंग संपल्यानंतर सुद्धा डॉक्टर म्हणाले  . कृपया आपण परत मुक्कामाच्या ठिकाणी जाऊ . आम्ही गाड्यांची व्यवस्था केली आहे .  राजेंनी त्यांना सांगितल मी जाणारच . हे पहा मी छत्रपती घराण्यात जन्मलेलो आहे. मला काहीही होणार नाही . तुमच्यासारखा मी सुद्धा कणखर योद्धा आहे. चिन्यांना डोळ्यात डोळे घालून मला सुद्धा बघायच आहे . शिवाजी महाराजांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे .  सर्वांचाच नाईलाज झाला. आणि पूर्ण ताफ़ा नाथूला कड़े रवाना झाला.आपले जवान किती खडतर परिस्थितीत देशसेवा करत आहेत हे पाहीले.

डोकलाम च्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिक व सेनाधिकाऱ्यांशी राजेंनी संवाद साधला . शिवरायांची युध्दनीती संदर्भात  सर्वांना मार्गदर्शन केले . सर्वांची मनापासून विचारपूस केली .  घरच्या माणसांची क्षेम खुशाली जाणून घेतली.

सिक्किम मधील सैनिकांच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनीराजेंचे मनापासून धन्यवाद् मानले . इतक्या नाजुक परिस्थितीत सुद्धा संभाजीराजेंनी दाखवलेला उत्साह आणि भारतीय सैनिकांविषयी त्यांच्या मनात असलेला आदरभाव बघून आम्ही खूप प्रभावित झालो आहोत.त्यांनी आमच्या पाठीवर मायेने फिरवलेला हात सदैव लक्षात राहील. शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या सैनिकांचा उत्साह असाच वाढवत होते. . आम्ही आज इथे आश्वासन देतो की आम्ही जीवंत असेपर्यंत भारताची एक इंच सुद्धा जमीन चीन घेऊ शकणार नाही .

आज १९६२ ची परिस्थिती नक्कीच नाही . देशाला सांगा की आपले बहाद्दर जवान सदैव तत्पर आहेत .
  आत्ताच आम्ही सर्वजण गंगटोक ला पोचलो . खरच मी मनोमन राजेंना मुजरा केला .
असा माणूस होणे नाही.

शब्दांकन::-
योगेश केदार ...
सचिव छत्रपती संभाजी राजे , खासदार राज्यसभा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !