अक्रुषक प्लाटवर कर आकारणी करण्याचे निर्देश ! महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० नुसार कर आकारणी !!!

नाशिक – : नाशिक जिल्ह्यातील सर्व अकृषिक प्लॉटवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० नुसार कर आकारणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेत जमिनी या अकृषिक बिनशेती करण्यात येत आहेत. मात्र अशा बिनशेती झालेल्या प्लॉटवर ग्रामपंचायती कोणत्याही प्रकारचा कर आकारत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीस सदर अकृषिक प्लॉट धारकांकडून नियमानुसार कराची रक्कम मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायातींचे आर्थिक नुकसान होत आहे. पर्यायाने ग्रामपंचायतीस करापासून अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नाही. त्यामुळे यापुढे नाशिक जिल्ह्यातील सर्व अकृषिक प्लॉटवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० नुसार कर आकारणी करण्याचेआवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)

विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !