सर्वात कमी दर असलेले पतंजलीचे सीमकार्ड उपलब्ध-नितीन महाजन, महाप्रबंधक, भारत संचार निगम , नासिक, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नासिक::-पतंजली मोबाईल सीम कार्ड चे भारत संचार निगम कडून गुरूवारी नासिक जिल्ह्यातील जनतेसाठी अनावरण करण्यात आले असुन कालपासुन त्याचे वितरण बीएसएनएल व पतंजलीच्या आऊलेटस् वरून सुरू करण्यात आले आहे अशी माहीती पतंजलीचे प्रांत प्रभारी, भारत स्वाभिमानचे कर्नल किरनसिंह पाटील व भारत संचार निगम नासिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
   सीम कार्ड विषयी माहीती देतांना ते म्हणाले की २७ मे रोजी रामदेव बाबा यांच्या हस्ते हरिद्वार येथे अनावरण करण्यात आले. भारत संचार निगम व पतंजली च्या या योजनेत कोणत्याही नेटवर्कमध्ये अमर्यादीत काँल्स, मोफत रोमींग सुविधा, दररोज दोन जीबी डाटा, १०० एसएमएस देण्यात येणार आहेत.
        या कार्डसाठी इतर नेटवर्कच्या तुलनेत सर्वात कमी दर आकारण्यात आले आहेत असे सांगतांना,
३० दिवसांसाठी १४४/-रू,  
१८० दिवसांसाठी ७९२/-रू,
व वर्षभरासाठी १५८४/-रू,  शुल्क राहील.
     सदरील योजना नविन कनेक्शनसाठी उपलब्ध आहे,
पतंजली समुहाच्या पाचही शाखांमधील सदस्य, पतंजली सम्रुद्धी कार्डधारक तसेच सदस्य नसलेल्या सर्वसामान्यांनाही हे कार्ड घेता येऊ शकते, याचबरोबर १०० रूपयांचे पतंजली सम्रुद्धी कार्ड सदस्यास पाच लाख रूपयांचा जीवन विमा संरक्षण , सहा महिन्यांत या कार्डद्वारे ६०००/- रूपयांची पतंजलीच्या स्टोअर्समधून खरेदी केल्यास अडीच लाखाचे अपघाती विमा संरक्षण मिळेल. या परिषदेस भारत संचार निगमचे अधिकारी, पतंजली समुहाचे मिलांद गणकर, किसन आव्हाड, सुनील गुरगुडे, विजयसिंग स्वदेशी, ब्रिजमोहन मुंदडा उपस्थित होते,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)