आवाहन-शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढविणे व सुसंक्रुत पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे-डाँ.नरेश गिते !! शाळेत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन नोंद करण्यात आली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

      नाशिक :  जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत असून या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक शिक्षकाने शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व सुसंकृत पिढी तयार करणेसाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी केले.

इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील रामरावनगर भागातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित शाळा प्रवेशोस्तव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ वैशाली झनकार, गट विकास अधिकारी किरण जाधव, सरपंच कांदाबाई बोटे, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र पवार. गटशिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ गिते यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. डॉ गिते यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्याने स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्यात आले.

रामरावनगर येथील अंगणवाडी केंद्रास डॉ गिते यांनी भेट देऊन तेथे सुरु असलेल्या बाल ग्राम विकास केंद्राची माहिती घेतली. या केंद्रात २ तीव्र कुपोषित बालक उपचार घेत असून त्यांच्या वजनात वाढ झाल्याचे आढळून आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।