सर्जनशील तरूणांसाठी हक्काचं व्यासपीठ ! युवती म्युझिकचं दुसऱ्या वर्षात पदार्पण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

‘अनप्लग्ड’ 'युवती म्युझिक'चं संगीत प्रेमींसाठी स्वतंत्र म्युझिक अॅप!

 'युवती म्युझिक'चं दुसऱ्या वर्षात पदार्पण!

 दर आठवड्याला एक नवे‘अनप्लग्ड’ गाणे!

सर्जनशील तरुणांसाठी हक्काचं व्यासपीठ!

नव्या पिढीच्या गीत,गायक, संगीतकारांनाहक्काचं व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने 'युवती म्युझिक'कंपनीची १६ जून २०१६ रोजी स्थापना करण्यात आली होती. 'बावरी साद' याअवीट गोडीच्या युगुल गीतासोबतच अप्रतिम व्हिडीओची निर्मिती करून या कंपनीने संगीत क्षेत्रात घट्ट पाय रोवलो.  नुकतेच या गोष्टीला दोन वर्ष पुंर्ण झाली. हे औचित्य साधून एक छोटेखानी कार्यक्रम नुकताच ‘दादर क्लब’च्या अलिशान बँक्वेट मध्ये पार पडला. या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील नवोदित आणि जेष्ठ मंडळींनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती.

‘बावरी साद’, ‘हे भवानी’, ‘हाल ए तमन्ना’ या अत्यंत सुरेख आणि लोकप्रिय ऑडीओ – व्हिडीओच्या निर्मिती नंतर ‘युवती म्युझिक’ने सातत्याने नव्याची कास धरीत दर्जेदार संगीत निर्मिती करणाऱ्या तरुणाई सोबत काम करणे पसंत केले आहे. कंपनीने ‘अनप्लग्ड’ संगीत निर्मितीवर लक्ष केंद्रित केले असून दर आठवड्याला एक नवे ‘अनप्लग्ड’ गाणे देण्यावर भर असणार आहे. नव्याने संगीतक्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या तरुणांसाठी आणि त्यांच्यासाठी निर्मिती करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या सध्याचा काळ अत्यंत नाजूक असाच म्हणता येईल. पण आपल्या विचारांसोबत तडजोड न करता खंबीरपणे गेली दोन वर्षे ‘युवती म्युझिक’चे प्रमोद वाघमारे संगीत क्षेत्रात धडपडणाऱ्या तरुणाईच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी आपल्या विचारांशी फारकत होऊ दिली नाही. गेल्या दोन वर्षात सातत्याने नाविन्यपूर्ण संगीतरचना देण्यात ते यशस्वी झाले आहेत. द्विवर्षपूर्ती होत असताना आणखी एक पाऊल पुढे जात ‘अनप्लग्ड’ गाण्यांसोबातच ‘युवती म्युझिक’ नवे ‘अॅप’ तयार करून रसिकांशी अधिक घट्ट मैत्री केली आहे. या नव्या अॅपवर रसिकांना बिनधास्त अमर्याद संगीताचा अखंड आनंद लुटता येणार आहे.
दोन वर्षांच्या या संगीत सफारीबद्दल बोलताना‘युवती म्युझिक’चे सर्वेसर्वा प्रमोद वाघमारे सांगतात त्यांची ही सफर सुरिली आणि मधुर होती. १६ जून २०१६ रोजी ‘युवती म्युझिक’चे पहिले गाणे प्रदर्शित झाले. त्यानंतर सातत्याने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या दर्जेदार संगीत कलाकृतींची निर्मिती होत राहिली. प्रतिभासंपन्न कलावंतांचं ‘युवती म्युझिक’हक्काचं व्यासपीठ बनलं. महाराष्ट्रासह, भारत आणि जगभरातील संगीतप्रेमी आणि कलावंत युवती सोबत जोडले गेले आहेत. त्यामुळे जबाबदारीही वाढत आहे.

‘युवती म्युझिक’ने सादर केलेल्या कलाकृतींना जगभरातील संगीतप्रेमी प्रचंड दाद देत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे ताजे टवटवीत करणारे संगीत सतत झळकत राहणार असून ते रसिकांसोबत अगदी मनापासून जोडले जाऊन त्यांच्यात एक ऋणानुबंध निर्माण झाले आहे. त्यातूनच‘युवती म्युझिक’ने नव्या स्वतंत्र संगीत अॅपची निर्मिती करून अमर्याद संगीत अनुभूतीला वेगळी वाट करून दिली आहे. या अॅपवरील वेगवेगळ्या ऑपशन्समुळे आपल्या आवडीचे गाणे निवडणे दर्दी रसिकांना अधिक सोप्पे जाणार असून ते ‘डाउनलोड’ करण्याचा मार्गही सुकर होणार आहे.

पहिल्या वर्षीच्या यशस्वी वाटचालीनंतर ही परंपरा कायम ठेवीत ‘युवती म्युझिक’ने ‘अनप्लग्ड’गाणं यांची शृंखला सुरु करीत‘तेरी याद’ हे त्यांचं पाहिलं गीत सादर केलं. गायक अक्षय कर्णिक आणि संगीतकार उमेश कुलकर्णी यांना ही पहिली संधी मिळाली. त्यांच्या या गीताला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर पवन वडूरकर या वैदर्भीय तरुणाच्या ‘आई’या कलाकृतीला युवतीने सादर करून रसिकांची उत्तम दाद मिळवली. तसेच राहुल सक्सेना याचे ‘मन ओसाड’ हे प्रेम भावना आणि त्यानंतरची तगमग व्यथित करणारं सुंदर गीत रसिकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. तसेच पियुष भिरूड याचे ‘कहेत कबीरा’ हे गीत असो कि कोमल धांदे, विजय गटलेवार जोडीचे ‘नसानसात’. दोन्हींही गीते रसिकांच्या पसंतीस पुरेपुरे उतरली आहेत. तसेच राहुल सक्सेना सोबत दुसरे गीत ‘तू ये ना प्रिये’ सादर करून चाहत्यांसाठी सुखद धक्का दिला आहे. त्याच्या या गाण्याला चाहत्यांचाही प्रतिसाद जोरदार मिळतोय. विजय गटलेवार यांचेही आणखी एक नवे गीत लवकरच रसिकांना ऐकायला मिळणार आहे. या सोबत अनेक दर्जेदार गीतांची शृंखला पुढे चालू राहणार असून ‘युवती म्युझिक’चे अॅप लवकरात लवकर इन्स्टॉल करावे,आणि या सुरेल प्रवासाच्या सफरीत अशीच साथ आणि दाद द्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !