महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा कौतुकास्पद उपक्रम-डाँ.नरेश गिते, ७०० मुलींसाठी वर्षभराच्या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या वह्यांचे मोफत वाटप !! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !

महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - डॉ. नरेश गीते

नासिक::-महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक व स्वयंसेवी संस्था यांचे वतीने इयत्ता पहिली ते दहावी इयत्तेच्या ७०० मुलींसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या एकूण ८००० वह्यांचे मोफत वाटपाचा कार्यक्रम शासकीय कन्या शाळा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला होता. "एक वही मोलाची, सावित्रीच्या लेकीची" हे ब्रीद वाक्य घेऊन औषध निर्माण अधिकारी संघटना गत चार वर्षापासून अखंडपणे या कार्यक्रमाचे नियमित प्रमाणे आयोजन करत आहे. मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.नरेश गीते यांचे शुभहस्ते पार पडला. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.श्रीमती वैशाली झणकर या उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शेवग्याच्या झाडाचे रोपटे देऊन करण्यात आले.*                                  
*डॉ.नरेश गिते यांनी आपल्या मनोगतात नमुद केले की, नाशिक जिल्हा परिषदेची पुरातन काळातील नाशिक शहरातील शासकिय कन्या विद्यालय ही मुलींची एकमेव शाळा असून या शाळेत गोरगरिब कुटूंबातील नाशिक शहरातील मुली शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींची कौटूंबिक आर्थीक परिस्थिती सर्वसाधारण असल्याने या मुलींना शैक्षणिक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकामी औषध निर्माण अधिकारी संघटना पुढाकार घेत असून या उपक्रमात सातत्य ठेवत असल्याबददल औषध निर्माण अधिकारी संघटनेचे पदाधिकारी एफ.टी.खान, हेमंत राजभोज, विजय देवरे व जनार्दन सानप यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.नरेश गिते यांनी विशेष अभिनंदन केले. डॉ. गिते पुढे म्हणाले की, दैनंदिन जीवनात काम करत असतांना प्रत्येक व्यक्तीने दातृत्व भावना ठेवल्यास आपणास आत्मिक समाधान लाभते. दातृत्व  भावना  प्रदिप राठी यांनी जोपासून आमच्या शासकिय कन्या विद्यालयातील मुलींसाठी खुप मोठे योगदान देत असल्याचे  प्रदीप राठी यांना खुप धन्यवाद दिलेत. गौरी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोहिनी नायडू याही शासकिय कन्या शाळेस योगदान देत असल्याबददल त्यांचेही कौतुक केले. शासकिय कन्या विद्यालयास कर्मचारी वृंदासह आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य राहिल, असे प्रतिपादन डॉ.गिते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती साठे यांनी करुन प्रास्ताविकात त्यांनी शाळेचा पुर्व इतिहास नमुद करुन शाळेत शिक्षण घेतलेल्या महान व्यक्तींचा गौरवोदगार केला. शासकिय कन्या शाळेतुन  मोठया प्रमाणात मुलींना शिक्षण घेऊन बऱ्याचशा मुली देश विदेशात मोठया पदावर कार्यरत असल्याचे नमुद केले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी शाळेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात नमुद केली.शाळेत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाचा माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल 88.39 टक्के लागलेला असून कुमारी त्रृप्ती चंद्रभान पोटींदे या विद्यार्थीनीस 86.80 टक्के गुण मिळाल्याचे सांगितले.  शाळेत इयत्ता दहावी मध्ये प्रथम, व्दितीय, व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यींनींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.*
*औषध निर्माण अधिकारी संघटनेचे सल्लागार जी.पी.खैरनार यांनी आपले मनोगतात जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत प्रशासनास आवाहन केले. तसेच सामाजिक बांधिलकी उपक्रमातुन शालेय अभ्यासक्रमाच्या वहया मोफत वाटपाचा कार्यक्रम अविरत पणे चालु ठेवण्याबाबत ग्वाही दिली. नाशिक जिल्हा परिषदेच्या उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सौ.स्वरांजली पिंगळे यांनी शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुली या खरोखरच सावित्रीच्या लेकी असून सावित्रीबाई फुलेंमुळेच आपण याठिकाणी शिक्षण घेऊ शकत असल्याचे नमुद केले. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे आपल्यासाठी खुली करुन दिली नसती तर आपण आजही अशिक्षीतच राहिलो असतो, असे नमुद करुन सौ.पिंगळे म्हणाल्या की, या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर व मी केवळ सावित्रीबाई फुले यांचेमुळेच उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपल्या समोर बोलू शकत आहोत. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.सौ.वैशाली झनकर म्हणाल्या की, शासकिय कन्या विद्यालय ही आमच्या जिल्हा परिषदेची मातृसंस्था असून या संस्थेसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याकामी तत्पर असल्याचे नमुद केले. तसेच शासकिय कन्या विद्यालयाचे शिक्षकांची पदे भरण्याबाबत तात्काळ प्राधान्याने कार्यवाही करु असे आश्वासीत केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, गौरी सामाजिक संस्थेच्या सौ. रोहिनी नायडू , शाळचे व्यवस्थापन समिती सदस्य सचिन मालेगांवकर, महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विजय देवरे, जिल्हाध्यक्ष एफ.टी.खान, कार्याध्यक्ष हेमंत राजभोज, दिलीप बच्छाव, जनार्दन सानप, उमेश भावसार, प्रेमानंद गोसावी, किशोर गव्हाळे, कुलदिप जाधव, प्रशांत कदम, व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  शाळेच्या शिक्षीका संगिता सोनार व बी.जी.गरड यांनी केले, तर आभार श्रीमती भारती जगताप यांनी मानले.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!