जेष्ठ साहित्यिक, पत्रकार अरूण साधू यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत "झिपऱ्या" चित्रपट आज प्रदर्शित होत आहे, दिग्दर्शक केदार वैद्य यांच्याशी केलेली बातचीत खास न्यूज मसालाच्या वाचकांसाठी, !! सविस्तर मुलाखतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

 दीनानाथ जी यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]

-ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारीत कलाकृती "" झिपऱ्या ""

  " झिपऱ्या " सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांची वास्तवाला धरून लिहिलेली - वास्तववादी कादंबरी ,,,, रेल्वे स्टेशन च्या वर " बूट पोलिश " करणाऱ्या मुलांचे जीवन व्यथित करणारी, मनाला भिडणारी खरीखुरी संवेदना " झिपऱ्या " मधून जाणवते. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवामध्ये " झिपऱ्या " ला पांच नामंकन मिळाली, 

अरुण साधू यांचे लिखाण हे मनाला भिडणारे, मानसिकतेला हाथ घालणारे आणि विचार करायला लावणारे आहे, अरुण साधू यांचा कालखंड सर्वाना माहित आहेच, त्यांच्या सर्वच साहित्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, त्यांच्या कालखंडात सहकार चळवळ उभी राहिली, आणीबाणी चा तो काळ होता, त्याच काळात अनेक संप - मोर्चे होऊन अनेकदा मुंबई करांचे जीवन ठप्प झालेले होते, साहित्य, नाटक, चित्रपटामधील दाहकता आणि वास्तवता याचा विचार सर्वसामान्य वाचक करू लागला होता, त्याच काळात राजकारण, समाजकारण इत्यादी क्षेत्रात अनेक प्रकारचे बदल घडत होते. त्याचवेळी भाषावाद, प्रांतवाद रचना, स्त्री-पुरुष समानता ह्याचे वारे वाहत होते, अश्या अनेक राजकीय, सामाजिक जडण-घडणीचा तो काळ होता, आणि त्याच काळात साहित्य क्षेत्रात महत्वाच नाव अरुण साधू यांचे घेतले जात होते. 

       अरुण साधू यांच्या लिखाणातून सर्वच समाजाचे प्रतिबिंब पडलेले आपणास जाणवेल, त्यांनी त्यांच्या लिखाणात समाजातील विविध घटकांना सामावून घेतले आहे. मुंबई मधील उच्च वर्ग असो किंवा सर्व सामान्य माणुस असो त्यांच्या लेखातून, कथा - कादंबरीतून त्याचे प्रतिबिंब दिसते. त्याच प्रमाणे विदर्भ, मराठवाडा, इथील गावागावामधील समाजाचे चित्रण त्यांच्या कथा-कादंबरी मधून चित्रित केलेलं आपणास दिसते. त्यामध्ये ते माणसा -- माणसा मधील भावना परिस्थिती आणि संघर्षाचा शोध घेत होते. मुंबई दिनांक,, सिंहासन,, मुक्ती,, अश्या अनेक पुस्तकामधून ते आपणास अनुभवास मिळते. मुंबई मधील लोकलचा प्रवास -- रेल्वेचे रूळ आणि त्याच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांना खुणावत होते, त्या ठिकाणी ते गेले तेथील परिस्थितीचे त्यांनी आकलन केल आणि त्यांना तिथे " झिपऱ्या " सापडला,,,, तेथील मुलांच्यावर फोकस करून तेथे बूट पोलिश करणाऱ्या मुलांना कादंबरीच्या मध्यवर्ती आणून त्यांनी झिपऱ्या लिहला. ज्या पद्धतीने ती मुल काम करीत आहेत त्याची उपासमार झाली तरी ती मुले भिक मागत नाहीत, ती काम शोधतात काम शोधण्याचा प्रयत्न करतात. 

 " झिपऱ्या " मध्ये सामाजिक आशय आहे, त्या मुलांची मानसिकता - समाजाकडे बघण्याची भावना त्यांनी ह्या कादंबरी मध्ये प्रभावीपणे मांडले आहे. समाजाबरोबर जोडलेलं एक वेगळ्या प्रकारचे नाते ह्या मध्ये चित्रित केल आहे. झिपऱ्या मध्ये झिपऱ्या बरोबर नाऱ्या, असलम, आणि लीला ह्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारलेल्या आहेत, 

झिपऱ्या चे दिग्दर्शक, केदार वैद्य यांची खास भेट घेतली,, त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, हि कादंबरी लोकांनाच इतकी आवडली कि त्याला मागणी खूप होती, माणसाना / वाचकांना बांधून ठेवणारी हि कादंबरी आहे, मी ज्यावेळी कादंबरी वाचली त्यावेळी माझे हि तसेच झाले, मला हि कादंबरी प्रचंड आवडली, ती मी अनेक वेळा वाचली, आणि प्रत्येक वाचनामध्ये मला नवनवीन अनुभूती येत होती, मी ह्या चित्रपट / मालिकेच्या क्षेत्रात आलो त्यावेळी ह्या क्षेत्राविषयी जाणून घेतले, मी त्याचा अभ्यास केला,  अनेक दिग्दर्शकांच्या बरोबर सहाय्यक म्हणून काम केले, पुढे - पुढे मला आत्मविश्वास आला त्यावेळी मी ह्या कादंबरीवर चित्रपट करावा असे मनांत आले. कारण ह्या " झिपऱ्या " ने मला मोहवून टाकले होते. त्यानंतर मी माझ्या एका मित्राच्या मदतीने श्रीमती अश्विनी दरेकर आणि श्री रणजीत दरेकर यांना भेटलो, त्यांनी निर्मिती करण्याची तयारी दाखवली, मी कादंबरी वर पटकथा लिहिली आणि ती अरुण साधू यांना दाखवली, त्यांना ती आवडली, त्यांच्या कडून मान्यता मिळाली, हि माझ्या साठी खूप मोठी गोष्ठ होती, त्यांचा आशीर्वादच मला मिळाला, त्यानंतर कलाकरांच्या शोधात असतांना मला एक - एक कलाकार भेटत गेले, ज्या ज्या व्यक्तिरेखा कादंबरी मध्ये आहेत त्याप्रमाणे मला कलाकार मिळाले, ,, " झिपऱ्या " मध्ये एक प्रकारची लीडरशिप करण्याची वृत्ती आहे, पण काही गोष्टी त्याला लोकांच्या समोर मांडण्यासाठी त्याला असलम ची मदत मिळायची, असलम हा झिपऱ्या च्या कामाचे मार्केटिंग करतो, त्याचे काम तो लोकांच्या पर्यंत पोहोचवतो. नाऱ्या हा शक्ती आणि बिनधास्तपणा चे प्रतिक असलेली व्यक्तिरेखा आहे. पण तो बुद्धीने थोडा मंद आहे. तो झिपऱ्या चे प्रत्येक बोलणे ऐकत असतो. त्याच प्रमाणे " लीला " हि व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे, ती ह्या सर्वांच्यावर लक्ष ठेऊन असते.   

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ चित्रपट येत आहे. ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित व सहनिर्माता अथर्व पवार क्रिएशन्स तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित, प्रेरणादायी  चित्रपट आपल्या भेटीला २२ जून ला येत आहे.... . 

मुंबईसह  अनेक मोठ्या रेल्वे स्टेशनवर आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी किशोरवयीन मुले बघितली असतील.  ‘झिपऱ्या’ चित्रपट अशाच मुलांच्या भोवती फिरणारा आहे.  यामध्ये रेल्वे स्टेशनवर बूट पॉलीश करणाऱ्या एका तरुणाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास मांडण्यात आलेला आहे. सभोवतालची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी सुद्धा भविष्याबाबत तो निराश नाही. दरम्यान, या जगण्याच्या संघर्षात झिपऱ्याला पोलिसांची भीती का वाटू लागते? झिपऱ्या आपल्या बहिणीच्या लग्नाच्या टेन्शन मध्ये नेमकं काय काय करतो? असे अनेक प्रश्न या चित्रपटात पडतात, या कथेत असलेलं एक गूढ आणि त्या भोवती घेरलेलं झिपऱ्या चं आयुष्य आहे. तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्यावर मात करून स्वतःसह मित्रांच्या आयुष्यात सोनेरी रंग भरण्यासाठी तो  धडपड करत आहे. वास्तवदर्शी  चित्रीकरण, वेगवान कथानक आणि आयुष्याकडे पहाण्याची सकारात्मक दृष्टी देणाऱ्या ‘झिपऱ्या’ बद्दलची उत्कंठा या ट्रेलर मधून अधिकच वाढली आहे. 

अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे. 

‘झिपऱ्या’चे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत ज्येष्ठ पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी यांनी दिले आहे. या चित्रपटाला समीर सप्तीसकर, ट्रॉय - अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत. तीन राज्य पुरस्कारांची मोहोर उमटलेला ‘झिपऱ्या’ येत्या २२ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

प्रशासन की ताकद !! बिगर मंत्री मंडल की सहायता के भी प्रदेश का शासन सफलतापूर्वक चलाया जा सकता है । प्रशासन को भी उन्होंने यह स्पष्ट संदेश दिया है कि मंत्रियों के बीच विभागों के बंटवारे के न हो पाने के बावजूद मुख्यमंत्री पूरे प्रदेश को ‘‘नौकरशाही‘‘ के माध्यम से आवश्यक कार्य निष्पादित (एग्जीक्यूट) कर संदेश देने में सक्षम हैं।