त्र्यंबकेश्वर येथील एका न्यासाचे एक विश्वस्त व देणगीदारांत सावरगांव येथे पोहचपावतीवरून वाद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

त्र्यंबकेश्वर येथील एका न्यासाच्या विश्वस्त व सावरगांव ता. निफाड येथील देणगीदारामध्ये आज सावरगांव येथे मोठ्या प्रमाणात वाद झाला याचे पर्यावसन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत झाले. यासंदर्भात कोणताही गुन्हा पोलीस दप्तरी नोंद झाला नाही मात्र ग्रामस्थांमध्ये व विश्वस्तांमध्ये हा विषय चर्चेचा होत आहे.
        अकरा हजार रूपयांची देणगी दिली होती त्याची पोहचपावती सदर विश्वस्ताकडे मागीतली मात्र आपण देणगीच दिली नाही तर पावती कुठुन देणार अशा प्रकारचे उत्तर मिळाल्याने देणगीदाराचा संताप झाला व दोघांत भांडणाची ठिणगी पेटली, सावरगांव ग्रामस्थांनी मध्यस्थी करून तुर्तास वाद मिटविला आहे.
      सदर विश्व्स्त यांनी अशाचप्रकारे यापुर्वी आपले पांडीत्व दाखवून पाच व्यक्तींकडून धनादेश घेतला होता त्याचीही पावती देणगीदारांना देण्यात आली नव्हती अशी चर्चा आजच्या प्रकाराने होत असुन याप्रकरणी न्यासाच्या अध्यक्षांकडे तोंडी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तोही विषय सामंजस्याने मिटविण्यात आला होता अशी माहीती अधिक्रुत व्यक्तीकडून प्राप्त झाली असुन लवकरच न्यासाच्या होणाऱ्या आगामी बैठकीत काय निर्णय होतो याकडे देणगीदाराचे लक्ष आहे.
         सदर घटनेचा सोशिअल मिडीयांतून निषेध व्यक्त केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।