अशोक उंबरे कुटुंबियांच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून सदैव उभा राहणार-छत्रपती संभाजीराजे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शिवराज्याभिषेक सोहळा संपवून उतरताना मृत्युमुखी पडलेले शिवभक्त
अशोक उंबरे यांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी उभा राहणार...संभाजीराजे छत्रपती.

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना, अंगावर दगड पडुन दुर्दैवी अंत झालेल्या अशोक उंबरे यांच्या घरी आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी  भेट दीली. अशोक उंबरे यानां आई नाहीत. त्यांचे वडील मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करतात.
त्यांच्या कुटुंबियांच्यावर या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबाचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले असून अशोक उंबरेचा मृत्यु मनाला चटका लावणारा आहे.
या दुखःद घटनेमूळे त्यांच्या कुटुंबियांच्यावर आघात झाला आहे. एक शिवभक्त म्हणून त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे.यापुढेही त्यांच्या कुटु़बियांची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून मी स्विकारत आहे,असे भावनिक उद्गार  संभाजीराजे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
अशोक चे मित्र भरतारी वारके यांना उंबरे कुटुंबाची सर्व जबाबदारी देण्यात आली असून या पुढे कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास त्वरीत संपर्क करण्यास सांगितले आहे.

तसेच मुख्यमंत्री साह्यनिधीतून २लाख रुपये व वयक्तिक मदत म्हणून १लाख रुपये त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!