शिक्षिकेचा प्रताप ! आतरजिल्हा बदलीत पती-पत्नी एकत्रिकरण करणे सोडून शिक्षिकेकडून खोटी माहीती सादर ! सबब शिक्षिकेस हजर न करता पाठविले परत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक – ऑनलाईन शिक्षक बदली प्रकियेत विशेष संवर्ग भाग २ मधून पती-पत्नी एकत्रीकरणबाबत चुकीची माहिती भरून अंतरजिल्हा बदलीने नाशिक येथे हजर होण्यासाठी आलेल्या कोल्हापूर येथील उप शिक्षिकेस परत पाठविण्यात आले असून याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेस पत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.
कोल्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील उप शिक्षिका प्रतिभा मोरे यांनी अंतरजिल्हा बदली टप्पा २ अंतर्गत विशेष संवर्ग भाग २ मधून बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची बदली होऊन त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेकडे हजर करून घेणेसाठी अर्ज दिला होता. याबाबत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता श्रीमती मोरे यांनी ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यांचे पती कोल्हापूर येथे सेवेत असतानाही त्यांनी पती-पत्नी एकत्रीकरण करणेसाठी अर्ज सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती सादर करून अंतरजिल्हा बदली केली असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना हजर न करता कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे परत पाठविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा