अक्षय कुमार प्रस्तुत "चुंबक" मराठी चित्रपट २७ ला प्रदर्शित होण्यास सज्ज !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! स्पेशल रिपोर्ट दीनानाथ यांजकडून फक्त न्यूज मसालावर !!

दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनधी ]

              अक्षय कुमार यांची प्रस्तुती असलेल्या चुंबक या मराठी चित्रपटातील दोन व्यक्तिरेखा पोस्टरचे प्रकाशन

दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात गीतकारगायक,लेखक स्वानंद किरकिरे आणि चित्रपटात पदार्पण करणाऱ्या कोल्हापूर येथील संग्राम देसाई यांची पोस्टर प्रकाशित

चुंबक’ २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
       बॉलीवूडमधील आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमार यांची प्रस्तुती असलेला चित्रपट म्हणून सध्या ‘चुंबक’चा मराठी चित्रपटसृष्टीत मोठा बोलबाला आहे. अक्षय कुमार यांनी सोशल मिडियाचा आधार घेत हा चित्रपट प्रस्तुत करत असल्याची घोषणा केली आणि या चर्चेला उधाण आले. ‘चुंबक’च्या चमूने आता आणखी दोन व्यक्तिरेखांची पोस्टर प्रकाशित केली आहेत. प्रसन्ना ठोंबरे आणि ‘डिस्को’ या त्या दोन व्यक्तिरेखा. प्रसन्ना ठोंबरे ही व्यक्तिरेखा दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे ख्यातनाम गीतकार, गायक, संगीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर‘डिस्को’ ही दुसरी व्यक्तिरेखा संग्राम देसाई या चित्रपटात पदार्पण करणाऱ्या, मुळचा कोल्हापूरचा असलेल्या संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारली आहे.
            स्वानंद किरकिरे हे चित्रपटातील प्रमुख भूमिकेत पहिल्यांदाच दिसणार आहेत. गतिमंदतेची समस्या असलेला आणि मुळचा सोलापूरमधील एका छोट्याशा गावातील असलेला प्रसन्ना त्यांनी साकारला आहे.
          नुकत्याच झालेल्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. प्रसन्नाच्या व्यक्तिरेखेसाठी स्वानंद ही एक चपखल निवड होती कारण त्यांच्यात लहान मुलाची निरागसता आहे आणि तीच या व्यक्तिरेखेची गरज होती, असे दिग्दर्शक संदीप मोदी यांनी म्हटले आहे.
          मोदी यांनी या निवडीचे सारे श्रेय चित्रपटाचे निर्माते नरेन कुमार आणि लेखक सौरभ भावे यांना दिले आहे. त्यांनीच स्वानंद यांचे नाव या व्यक्तिरेखेसाठी सुचवले होते. ही निवड थोडीशी वेगळी होती कारण त्यांनी आत्तापर्यंत अशा मध्यवर्ती भूमिकेत काम केले नव्हते.
              देशातील एक आघाडीचे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक स्वानंद किरकिर म्हणाले, “मला सुरुवातीला असे वाटले की या चित्रपटाच्या संगीतासाठी चित्रपटाची टीम मला भेटते आहे. पण माझ्याकडून त्यांना अभिनय करून घ्यायचा आहे आणि त्यातही ही मुख्य भूमिका आहे,असे जेव्हा मला कळले तेव्हा मला धक्काच बसला. ही भूमिका म्हणजे एक आव्हान होते. पण चित्रपटाची पटकथा ऐकली आणि माझ्यावरील या टीमचा विश्वास बघितला व आम्ही म्हणजे मी,संदीप, सौरभ आणि नरेन यांनी त्यात उडी घ्यायचे ठरवले.”
       “एक निरागस आणि गतिमंद अशा पुरुषाची व्यक्तिरेखा मला साकारायची होती. आपल्या आसपासच्या लोकांचे निरीक्षण करत आणि त्याच्या जोडीला या क्षेत्रातील डॉक्टर आणि समुपदेशक यांच्याशी चर्चा करत ही व्यक्तिरेखा मी साकारली आहे. ही व्यक्तिरेखा आम्ही एक एक वीट रचावी तशी अभ्यासत आणि सकारात गेलो. त्यातून त्यातील प्रेमळपणा या व्यक्तिरेखेत येत गेला आणि तिची प्रतिष्ठाही राखता आली,” असे उद्गार दिग्दर्शक संदीप मोदी यांनी काढले.
           प्रसन्नाबरोबर दुसरे पोस्टर आहे ते‘डिस्को’ची भूमिका साकारणाऱ्या संग्राम देसाईचे. परराज्यातून आलेल्या आणि मुंबई मोबईल रिपेरिंगचे काम करणाऱ्या तरुणाची ही व्यक्तिरेखा आहे. कास्टिंग टीममधील रोमिल मोदी आणि तेजस ठक्कर यांना संग्राम कोल्हापूरजवळील एका गावात अगदी अनपेक्षितपणे सापडला. परराज्यातून आलेल्या पण हुशार अशा मोबाइल मेकॅनिकची भूमिका साकारण्यासाठी संग्रामला शहरातील व्यक्तिरेखांचा अभ्यास करावा लागला. त्यासाठी तो मुंबईत एक महिना राहिला. त्यासाठी दिग्दर्शक संदीप मोदी आणि लेखक सौरभ भावे यांनी त्याला खूप मदत केली.
           या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना संग्रामने मोबाईल दुरुस्त करण्याचे थोडेबहुत प्रशिक्षणही घेतले.
           अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!