साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील  शिक्षकांचा सन्मान..... !! एक मोठं कुटुंब तयार झालं याचा मला अभिमान वाटतो, या कुटुंबातील  सदस्य शिक्षकांना सामना कराव्या लागणाऱ्या स्थानिक तसेच राज्यस्तरीय प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी आपल्या सोबत राहील - अध्यक्ष संजय देवरे !!! एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम !!!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in -संपादक नरेंद्र पाटील ,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील  शिक्षकांचा सन्मान.....
         जळगाव::- एस. के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट आणि गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुणे जळगावच्या प्रथम नागरिक सिमाताई भोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, यावेळी तहसीलदार कैलास चावडे, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य चौधरी , जैन ग्रुपचे किशोर कुलकर्णी, एस.के.डी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय देवरे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार आदी मान्यवर  उपस्थित होते.
          पुरस्कार वितरणानंतरच्या एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे यांनी जिल्ह्यातील उपस्थित शिक्षक, त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी संवाद साधताना आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील पाहीलेले वास्तव व त्यातून पुढे समाजातील घटकांसाठी कार्य करणे, ही भावना रूजविण्याचे अपरोक्षपणे,  व अव्याहत कार्य शिक्षकांकडून केले जाते अशा सर्वच शिक्षकांचा हा गौरव सोहळा आहे, याप्रसंगी त्यांनी देवळा तालुक्यातील खेड्यातून मी तेथील शिक्षकांनी मला दिलेले संस्कार घेऊन बाहेर पडलो व आज एक यशस्वी संस्थापक संस्थाचालक, यशस्वी उद्योजक म्हणून आपल्या समोर आहे, कुटुंबाची चिंता मिटली की समाजाची जाणीव जेथे निर्माण होते तेथे मागे वळून पाहताना माझे खेड्यातील कुटुंब, माझे गांव व मुख्य म्हणजे मला घडविणारे शिक्षक दिसतात तोच जाणतो की आता समाजातील एखादी जबाबदारी घ्यायला हवी त्याप्रमाणे मी खेड्यातील मुलांसाठी प्रथम सीबीएसई धर्तीवरची निवासी शाळा देवळा तालुक्यात सुरू केली, तसेच माझा व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यावर मी निर्णय घेऊन शिक्षक व शिक्षण या घटकांच्या विकासासाठी व अडचणींना सोडविण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली, आज उत्तर महाराष्ट्रातील अनेक शिक्षक माझ्या संपर्कात आले, एक मोठं कुटुंब तयार झालं याचा मला अभिमान वाटतो. या कुटुंबातील  सदस्यांना सामना कराव्या लागणाऱ्या स्थानिक तसेच राज्यस्तरीय प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी आपल्या सोबत राहील असे मनोगत व्यक्त केले.
         पुरस्कार सोहळा यशस्वीतेसाठी गिरणा गौरव प्रतिष्ठान चे सुरेश पवार, एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचे सुशील देवरे, अतुल पाटील, मंगेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !