जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येणार- भुवनेश्वरी एस. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!नाशिक – मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी महिला व बालविकास विभागाच्या सर्व संबधित अधिकारी व कर्मचा-यांना पोषण अभियानाबाबत सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेच्या महिला व  बालविकास विभागाच्या वतीने पोषण अभियानाबाबत आज जिल्हास्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोषण अभियान हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार असून मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळणेसाठी व माता व बालकाचे पोषण योग्यरित्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी प्रभातफेरी, दिंडी, विविध स्पर्धा. पोषण मेळावे आदि विविध प्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिले असून जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनाही या कार्यक्रमामध्ये सहभागी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
दरम्यान, आजच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अंगणवाडीमधील विविध भौतिक सुविधांबाबत जिल्हयाकडे माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच पोषण आहार अभियानात विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचना देतानाच यापूढे प्रत्येक महिन्यात उत्कृष्ट काम करणा-या अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिकांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले.  यामध्ये प्रामुख्याने पोषण आहार व त्याचे महत्व, स्तनपान, अनेमिया आजार, वैयक्तिक स्वच्छता आदि विषयांवर अधिक लक्ष देण्यात येणार असून गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयी याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अंगणवाड्यांना पाण्याची सुविधा. स्वच्छतेची सुविधा इमारत सुविधा यासाठी यासाठी आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांना त्यांच्याशी संबधित जबाबदारीचे वाटप करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी सांगितले. मागील वर्षी नाशिक जिल्हयाने पोषण आहारात उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. २ ऑक्टोबर रोजी शासनाच्या एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने पोषण आहार अभियानाच्या कार्यक्रमात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर यांनी जिल्हयाचा सन्मान स्विकारला होता. आज झालेल्या कार्यशाळेस बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, गटसमन्वयक आदि उपस्थित होते.
प्रभावीपणे अभियान राबविणार - भुवनेश्वरी एस
पोषण अभियान हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येते. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळणेसाठी व माता व बालकाचे पोषण योग्यरित्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर यांच्यासह सर्व पदाधिका-यांच्या सहकार्याने यावर्षीही जिल्हयात प्रभावीपणे अभियान राबवून कुपोषण निर्मुलनासाठी विशेष लक्ष देण्यात येईल.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!