विविध सामाजिक संस्था, कारखाने यांनी त्यांच्या सीएसआर निधीचा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसाठी वापर करुन सामाजिक दायित्व निभाविण्याचे व जिल्हयातील ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी योगदान देण्याचे आवाहन-अध्यक्षा शितल सांगळे ! जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे गरजेचे-भुवनेश्वरी एस. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल-संपादक नरेंद्र पाटील !!!!

नाशिक – समाजाला समृध्द आणि सशक्त करण्याची क्षमता शिक्षणात आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे काळाची गरज आहे. विविध सामाजिक संस्था, कारखाने यांनी त्यांच्या सीएसआर निधीचा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसाठी वापर करुन सामाजिक दायित्व निभाविण्याचे व जिल्हयातील ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी केले.
        जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आज वडाळारोडवरील अशोका कॅम्पसमध्ये नाशिक कलेक्टिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सौ सांगळे बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विविध सामाजिक संघटना, कारखाने यांचे एकत्रिकरण करण्यात येवून सीएसआर सेलची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत आज सर्व घटकांसाठी नाशिक कलेक्टिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले.
        पुढे बोलताना शितल सांगळे यांनी शाळाबाहय मुलांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांप्रमाणेच क्रिडाविषयक सुविधा व मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा डिजिटल झाल्या असून अनेक शाळा खाजगी शाळांपेक्षा दर्जेदार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
        जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी यावेळी बोलताना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
       जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये विविध कौशल्य असून पुरेशा सुविधा व मार्गदर्शन मिळाल्यास क्रिडा प्रकारात ग्रामीण विद्यार्थी पुढे जावू शकतात त्यामुळे सीएसआर निधीतून यासाठीही सुविधा देवून ग्रामीण विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
       राज्याच्या शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी व्हिडीओ कॉलव्दारे संवाद साधत राज्यात नाशिक जिल्हयानेच सर्वप्रथम सीएसआर सेल स्थापन करुन काम सुरु केल्याबददल जिल्हयाचे अंभिनंदन केले.
       प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांनी कार्यशाळेचा उद्देश व सीएसआर सेल याबाबत माहिती दिली. या सेलमार्फत ग्रामीण भागात आवश्यक असलेल्या विविध सुविधांचे नियोजन करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कॉन्फरन्समध्ये विविध शैक्षणिक घटकांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नाशिक कलेक्टिव्ह पोर्टल अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सर्वसुत्र या ॲपचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  बॉश, सॅमसोनाईट, रोटरी क्लब आदि कारखान्यांचे तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!