एचबीएन गुंतवणूकदारांना लवकरच परतावा मिळणार-गणेश नरेडी ! देशभरात एचबीएन चे लाखो गुंतवणूकदार !! जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये एचबीएन मध्ये !!! केबीसी, इमू, समृद्धी जीवन, संजीवनी, मैत्रेय सारख्या अनेक कंपन्यां येऊन गेल्यात व गुंतवणूकदारांच्या संकल्पसिद्धिस बेचिराख करून गेल्यात तरीही गुंतवणूक दारांचा हव्यास संपत नाही !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

एचबीएन गुंतवणूकदारांना लवकरच परतावा मिळणार-गणेश नरेडी !              
   
संकल्पसिद्धि लवकर व्हावी अशी आशा बाळगून अनेक गुंतवणूकदार आपल्या घामाचा, कष्टाचा पैसा अमीषापोटी कंपन्यांमध्ये, नेटवर्कर च्या माध्यमातून गुंतवतात व थोड्याच कालावधीत कंपनी फरार होते, होते नव्हते ते सारे संपुष्टात येते तरीही सर्वसामान्य माणूस पुन्हा पुन्हा आमीष मार्गांवर का जात राहतो ? हा प्रश्र्न जर प्रत्येक वेळी स्वताला विचारला तर अशी वेळ अनेकांवर येणार नाही ! एचबीएन गुंतवणूक दारांचे पैशांचा परतावा मिळावा व कुटुंब सुखासमाधानात रहावे या शुभेच्छांसह !
                         -- संपादक,
           नासिक(१८) ::- आॅल एचबीएन इनव्हेस्टर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश नरेडी , ट्रस्टी संतोष निर्मलकांत, एन.डी.साहू, राजू दोडके, नासिकचे श्रीराम चित्ते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की नॅशनल लाॅ  ट्रिब्युनल यांचे मार्फत लवकरच एचबीएन गुंतवणूकदारांना परतावा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
          संस्थेच्या वतीने मा. नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्युनल मध्ये दावा दाखल केला होता त्याचा निकाल देताना १४ आॅगस्ट २०१९ रोजी एचबीएन ट्रस्टच्या बाजूने निर्णय देण्यात आल्याची माहिती दिली. कंपनीची सर्व चल-अचल संपत्ती सेबीच्या ताब्यात आहे, ही सर्व संपत्ती विकून गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा देण्यात यावा असा निर्णय आहे, याबाबत सेबीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, आयकर विभागाकडील एचबीएन कंपनीची जोडसंपत्ती ही मा. नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्युनल कडे सोपविण्यात आली आहे त्यासाठी आर.पी. (रिजुलेशन प्रोफेशनल) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यानंतर नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्यूनल चा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने तसाच ठेवत सेबीला गुंतवणूक दारांच्या हिताचा निर्णय होण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार  यामुळे एचबीएन गुंतवणूकदारांना लवकरच पैसे मिळतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
*************************
संभ्रमावस्था::-आॅल एचबीएन इनव्हेस्टर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश नरेडी, ट्रस्टी संतोष निर्मलकांत व इतरांनी नासिक जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना सदर माहिती मिळावी यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, ऑल एचबीएन इनव्हेस्टर ट्रस्टही एक दिल्ली येथे नोंदणी केलेला (सकृतदर्शनी दिलेल्या पत्रकावरुन) असून यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांना कितपत यश येईल अशी शंका काही गुंतवणूकदारांकडून व्यक्त केली जात होती, आधीच दुधाने ओठ पोळले म्हणून ताकही फुंकुन पिणे या म्हणीप्रमाणे नासिक मधील एचबीएन गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत.
खरोखर पैसे मिळतील का ? नाहीतर तेलही गेले अन् तुपही गेले असं घडू नये यासाठी काही गुंतवणूकदार मनोमन प्रार्थना करीत होते तर काही त्यांना विश्र्वास देत होते की पैसे लवकरच परत मिळतील.
*************************

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक