छावा क्रांतीवीर सेनेचे ५ वे राष्ट्रिय महाअधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न ! ठराव मंजुरीसह राज्यातील उत्कृष्ट मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले !! खासदार, आमदार, साधू-महंत, नेत्यांच्या उपस्थितीत यशस्वी अधिवेशन पार पडले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!


छावा क्रांतीवीर सेना, महाराष्ट्र.आयोजित ५ वे राष्ट्रिय महाअधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न.
             शिर्डी::-उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
      छावा क्रांतीवीर सेना. महाराष्ट्र ,५ वे राष्ट्रीय महाअधिवेश ,रविवार दि.११/०८/२०१९ रोजी सिद्धसंकल्प लॉन्स ,शिर्डी,राहता रोड येथे सायं ठीक ०५ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवशाहीर सुरेश जाधव यांचा भव्य शाहिरी पोवाड्याचा कार्यकमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करत सुरू झाले.
यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा आदी क्षेत्रातील तसेच महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली., अधिवेशनाचे अध्यक्ष :-आ. विनायक मेटे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मुंबई
अधिवेशनाचे उद्घाटक :-  प.पूज्य.राष्ट्रसंत ” भय्यूजी महाराज . “ यांच्या धर्मपत्नी डॉ.आयुषी उदयसिंह देशमुख ,इंदोर व मान्यवरांच्या यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक विश्वनाथ वाघ प्रदेश कार्याध्यक्ष यांनी केले.
संघटनेचे आतापर्यंतच्या वाटचालीतील कार्य व त्याचा लेखाजोखा, संघटन पातळीवर विविध आंदोलने, प्रामुख्याने मराठा क्रांती मोर्चा ,किसान क्रांती मोर्चा यामध्ये संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली संघटनेने हिरारीने भाग घेऊन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व विविध मागण्या मान्य करून घेण्यात आल्या. अल्पावधीत संघटना मोठ्या धर्तीवर काम करत आहे असे छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष
उमेश शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
५ वर्षापूर्वी परमपूज्य आदरणीय भय्यूजी महाराज यांनी
मुहूर्तमेढ रोवलेल्या या संघटनेचे छोट्याशा रोपाचे वटवृक्षात रूपांतर झालं असे अनेक मान्यवरांनी आवर्जून आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
मनपा नाशिक स्थायी समिती सभापती उद्धव बाबा निमसे यांनी संघटनेच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक करून छावा क्रांतिवीर सेना ही झपाट्याने वाढणारी संघटना म्हणून नावारूपास येत आहे असे आवर्जून आपल्या मनोगतात व्यक्त केले.
नगरसेवक दिनकर आण्णा पाटील यांनी संघटनेच्या कामाचे कौतुक करून मराठा क्रांती मोर्चा मधील अनेक प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी आपण पुढाकार घेऊन आपल्या नेतृत्वाखाली या मागण्या महाराष्ट्र सरकारकडून पूर्ण करून घ्याव्या अशी अपेक्षा व्यक्त केली व महाराष्ट्र मधील एकमेव आपली संघटना आहे जी मुख्यमंत्र्यांकडून या राहिलेल्या प्रलंबित प्रश्नांवर वाचा फोडून त्या सत्यात उतरवू शकतात.
खासदार हेमंत पाटील यांनी समाजाच्या वाताहतीस कारणीभूत असलेल्या अंधश्रद्धा ,धार्मिक रूढी, परंपरा वैवाहिक सोहळे आदी या अशा अनेक घटनां आदी गोष्टींपासून समाजाला दूर राहिले पाहिजे असे उपक्रम आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करून संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मराठा आरक्षणाच्या लढ्यात माझ्या वतीने योगदान देण्याचे भाग्य मला मिळाले अशा त्यांच्या वतीने भावना व्यक्त करण्यात आल्या.
संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी संस्थापक म्हणून संघटन पातळीवर अनेक आघाड्यावर संघटन वाढवून  ,युवक ,विद्यार्थी,शेतकरी, कामगार ,चित्रपट ,आदी क्षेत्रात संघटना जोमाने काम करत आहे उपस्थित सर्व मान्यवरांनी अपेक्षा केल्याप्रमाणे संघटना पुढील कार्य काळामध्ये नक्कीच अधिकचे अपेक्षित काम करीत राहील अशी ग्वाही दिली.बहुजन समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी छावा क्रांतिवीर सेना नेहमी तत्पर असेल तसेच  मराठा समाजाच्या व शेतकरी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर संघटन पातळी शासन व प्रशासन यांना जाग आणण्यासाठी आंदोलन मोर्चे आदींचे आयोजन करून समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत समन्यायी विकास पोचवण्यासाठी काम उभे केले जाईल अशी खात्री देण्यात आली तसेच राज्यातील पूर परिस्थितीवर सरकार व प्रशासन गंभीर नसून वेळीच उपाययोजना केली असती तर भयंकर पूर परिस्थिती  व झालेले नुकसान टाळता आले असते .पूरग्रस्तांसाठी शासनाने त्वरित नुकसान भरपाई दिली पाहिजे. संघटनेच्यावतीने जिल्हास्तरीय वस्तू रुपाने व आर्थिक मदत पूरग्रस्तांसाठी उभी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे तसे सर्वांना आवाहन देखील करण गायकर यांनी संघटनेच्यावतीने करण्यात आले.
डॉ आयुषी देशमुख यांनी परमपूज्य आदरणीय भय्यूजी महाराजांच्या आठवणीतले क्षण यावेळी सांगितले छावा क्रांतिवीर सेनेची मुहूर्तमेढ महाराजांच्या हस्ते करण्यात आली आहे त्यामुळे संघटनेचा कुठलाही कार्यक्रम गुरुजी टाळत नव्हते मागील अधिवेशनावेळी प्रकृती ठीक नसताना देखील त्यांनी आवर्जून कार्यक्रमासाठी हजेरी लावली कारण त्यांचे विशेष प्रेम करण गायकर यांच्यावर व संघटनेवर होते.
अध्यक्षीय भाषणात मा.आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी अनेक संघटनांनी, बांधवांनी प्रयत्न केले त्यात छावा क्रांतिवीर सेना अग्रणी राहिलेली आहे तरुण नेतृत्व व जास्तीत जास्त समाजाच्या प्रति काम करण्याची प्रबळ इच्छा असलेल्या पदाधिकारी व सदस्यांचा भरणा असलेल्या संघटनेमुळे ते शक्य होते .मराठा क्रांती मोर्चा यात करण गायकर यांनी राज्यभर चांगल्या प्रकारे काम केले आहे असे त्यांनी आवर्जून उल्लेख केला मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असताना करण गायकर यांच्या संघटनेने मला देखील अनेक वेळेस विरोध केला परंतु मी आपल्या भावना समजून कधी वैयक्तिक पातळीवर विरोध घेतला नाही समाजाचं काम करत असताना आपल्या माझ्याकडून नेहमी अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेत होतो आणि आपल्या सर्वांच्या मेहनतीला यश म्हणून मराठा आरक्षण सरकारने लागू केल. या आरक्षणासाठी अनेक लोक कोर्टात गेले आहे परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही आरक्षण देत असताना राज्य सरकारने पुरेपूर व्यवस्थित खबरदारी घेतलेली असून घटनात्मक पातळीवर आरक्षण टिकाव म्हणून अभ्यासपूर्ण आरक्षण जाहीर केले असुन कायद्याने देखील संमत केलेले आहेत .
संपूर्ण देशाच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई येथील भव्य स्मारक उभे करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. जगात सर्वात उंच स्मारक म्हणून  आज स्मारकाकडे बघण्यात येत आहे त्यादृष्टीने आम्ही कामकाज देखील सुरू केलेले आहेत परंतु अनेक लोक या कामांमध्ये खोडा घालण्याचे काम करत आहेत अनेक तांत्रिक अडचणी दूर करून कामाला शुभारंभ झालेला आहे.
पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्ष स्मारकाच्या बांधकामाच्या  कामाला देखील सुरुवात होणार आहे यावेळी आपल्या संघटनेतील व इतर संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विशेष बोटीने स्मारकाच्या प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पुढील कामाचा लेखाजोखा आढावा आपल्यापुढे सादर करण्याचे भाग्य मला मिळावे अशी देखील या ठिकाणी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.उपस्थित सर्व मान्यवरांनी संघटनेच्या कामाचे कौतुक करुन अभिनंदन केले व शुभेच्छांचा वर्षाव यावेळी करण्यात आला.
अधिवेशनात विविध मागण्याचे ठराव करण्यात आले.
१) सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे
२) शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी व शेत मालाला हमीभाव,दुधाला हमीभाव मिळावा .स्वामीनाथन
आयोगाची अंमलबजावणी व्हावी.
३) विद्यार्थ्यांची व शिक्षकांची लूट संस्थाचालकांकडून होत आहे ती शासन स्तरावर थांबवावी.
४) सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची लूट होत आहे ही शासन स्तरावर थांबवावी.
५) ऑनलाईन कामकाज धोरण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे .
६) महाराष्ट्रातील सर्व गडकोट, किल्ले ,ऐतिहासिक वारसा संवर्धन झाले पाहिजे .
७) मराठा क्रांती मोर्चातील आंदोलनातील मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे बिनशर्त मागे घ्यावे.
८) मराठा क्रांती मोर्चाच्या उर्वरित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात .
९) अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व इंदू मिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर    यांचे स्मारक तात्काळ पूर्ण करावे.
१०) महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थश्रेणी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे.
११) शेतीला अखंडित मोफत वीज पुरवठा द्यावा.
यावेळी अनेक पुरस्कारार्थीना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.,
शिवाजीराव जोंधळे - शैक्षणिक रत्न, साकिबभाई गोरे - दृष्टी  दूत, निलेश सांबरे-  समाजरत्न, जगदीश गोडसे - कामगार रत्न, दिनकर धर्माजी पाटील - आदर्श नगरसेवक, माधुरी अनिल गजकोष - आदर्श उद्योजक, राजेंद्र नारायण शितोळे - आदर्श सरपंच, अशोक किसनराव डवले -सैन्यदलात उत्कृष्ट कामगिरी, यादवेंद्र दीलीप शर्मा -  युवा उद्योजक, कु .निकिता धनंजय जाधव – कृषिकन्या, रवींद्र रामनाथ पवार - युवा उद्योजक, सौ किरणताई योगेश (बाळा ) दराडे - आदर्श नगरसेविका, दिलीप भाऊ रोहोम - विशेष सहकार्य सिद्ध संकल्प लॉन्स
इंजि कु. जानवी शिवाजी मोरे हिची नामांकित कंपनीत निवड   झाल्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
      यावेळी अधिवेशनासाठी प्रमुख उपस्थिती आ.बाळासाहेब थोरात - प्रदेशाध्यक्ष ,राष्ट्रीय काँग्रेस, आ. विनायक मेटे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मुंबई, अभिजीत राणे - धडक कामगार युनियन महासचिव तथा मुंबई मित्र वृत्त मित्र समूह संपादक कामगार नेते, खासदार हेमंत पाटील- हिंगोली, सुनील बागुल- भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, उद्धव निमसे स्थायी समिती सभापती मनपा नाशिक, शिवाजी सहाणे, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे
पूज्य शांतिगिरी महाराज महामंडलेश्वर १००८ ” यांचे वतीने आशीर्वाद देण्यासाठी अनेक महंत व विष्णु महाराज
उपस्थिती होते .
आदी मान्यवर छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र ,५ वे राष्ट्रीय महाअधिवेश प्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव ,शेतकरी ,कष्टकरी ,विद्यार्थी , कामगार आदी क्षेत्रातील नागरिक उपस्तित होते.
यावेळी उपस्थित सर्वांचे छावा क्रांतीवीर सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग यांनी आभार मानले.
अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मा  विश्वनाथ वाघ प्रदेश कार्याध्यक्ष व सर्व प्रदेश कार्यकारणी सदस्य, विशेष करून अहमदनगर जिल्हा कार्यकारणी आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
यावेळी राजेशजी मोरे,उमेश शिंदे सर,शिवाजीराजे मोरे,नवनीत महाराज गोरले,नितिन सातपुते,संतोष माळोदे,अनिल राऊत,पंकज जर्हाड,चंद्रशेखर विसे,नितिन शिंदे,नवनाथ शिंदे,किरण बोरसे,ज्ञानेश्वर थोरात,नितिन दातीर,किरण डोखे,शांताराम गायकवाड,प्रा.अविनाश सोनवणे,विशाल गव्हाणे,रामेश्वर बावने,अशोक डौले सर,धनराज लटके,गणेश माने,गोरख महाराज आहेर,वंदना ताई कोल्हे,अनिता ताई पैठणपगार,छाया ताई खैरनार,पूजा ताई दुमाळ,मनोरमा ताई पाटिल,अनिता ताई शिंदे,मा.दादासाहेब शिंदे,मिलिंद चिटणीस,अनिल केंगार,नागेश मिठे पाटिल,गणेश गांजरे, सुपडु दादा पाटिल,विजय खर्जूल,सागर भोसले,राजाराम शिंदे,समाधान सुरवसे, गंगाधर औताडे, राहुल चाळक, विष्णु मुळे,संतोष व्यास,दिलीप गवळी,दगडोबा जोगदंड पाटिल,सोमनाथ विभूते,देवानंद विचारे,संदीप ठाकरे,सुनील शेळके,ओम पराळे,अविनाश कापडने,दीपक मुळीक,अमोल विसे,अविनाश जाधव, विजय धुमाळ,दीपक सकटे,नितिन पवित्रकार, भास्कर जाधव आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित