महादेव जानकर धनगर समाजाला न्याय मिळवून देणार काय ? येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत राहणार काय ? सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


महादेव जानकर धनगर समाजाला न्याय देणार का?
            नागपूर (प्रतिनिधी)::-नुकताच पार पडलेल्या गीता कृष्ण महिला अर्बन क्रेडिट कोआॅप. सोसायटी नागपूर यांच्या सौजन्याने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्ष भव्य कार्यकर्ता मेळावा, जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांना चा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना १००० स्कूल बॅग वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रमाचे आयोजन लोकेश रसाळ व सह आयोजक प्रा. सौ.माधुरी पालीवाल यांनी केले. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लाभलेले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कॅबेनेट मंत्री, महादेव जानकर, राज्यमंत्री दर्जा प्राप्त शेळी व मेंढी विकास महामंडळ अध्यक्ष बाळासाहेब दौडतले, खा. कृपाल तुमाने, आ,सुधाकर देशमुख, आ.मोहन मते, भाजपा महामंत्री राजाभाऊ पातकर, व भाजपचे ज्येष्ठ नेते, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धनगर समाजाला आरक्षण जर कोणी मिळवून देईल तर फक्त भाजप सरकार देईल असा विश्वास बावनकुळे  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिला.  महादेव जानकर यांनी धनगर समाज आरक्षण संदर्भात तसेच येत्या विधानसभा निवडणुकी मध्ये आपण भाजपशी युतीत राहू असे पत्रकारांना सांगितले.  आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकार नक्की सोडवेल असे जाहीर कार्यक्रमात सांगितले, विदर्भातील पक्ष कार्यकर्ता वाढविण्यावर भर द्यावा, तसेच विदर्भातील लोकेश रसाळ, माधुरी पालीवाल, स्वरणीम दीक्षित या कार्यकर्त्यांना उच्च पदावर विराजमान करावे असे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी जानकरांना सांगितले, येत्या विधानसभा निवडणुकीत जानकरांची भूमिका नक्की यशस्वी ठरेल असे बावनकुळे यांनी गृहीत धरत त्यांच्या धनगर समाजास दिलेल्या मागण्यांसाठी आश्र्वसित केले. यावेळी विदर्भातील कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लोकेश रसाळ, माधुरी पालीवाल यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!