अखिल भारतीय छावा संघटना महिला आघाडी आयोजित वीर जवानांचे औक्षण करून रक्षाबंधन सोहळा साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर यांच्या तर्फे रक्षाबंधन चे चित्य साधून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचे आकर्षण करून राखी बांधण्यात आली !
        नासिक (१३)::-अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर ह्यांचे संयुक्त विद्यमानाने आज देशाचे संरक्षणासाठी आपल्या परिवारा पासुन दुर राहुन भारतीय नागरिकांच्या रक्षणासाठी लढणाऱ्या तसेच आता झालेल्या कोल्हापूर-सांगली येथील पुर ग्रस्तांना सहकार्य करणाऱ्या विर जवानांना काल (दि.१२) रक्षा बंधना निमित्त देशाचे रक्षण करणाऱ्या  जवानांना अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर ह्यांचे संयुक्त विद्यमाने छावा महिला पदाधिकारी तसेच सरस्वती विद्यालय मधील विद्यार्थीनी यांच्या हस्ते जवानांना औक्षण करून राखी बांधण्या आली.या वेळी जवानांनी देशाचे व देशातील नागरिकांचे, माता-भगीनींचे सतत रक्षण करु असे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन संतोष शिंदे व अखिल भारतीय छावा महिला जिल्हाअध्यक्ष ज्योती झणकर यांनी केले होते, हया वेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटनेचे ज़िल्हाध्यक्ष आशिष हिरे, नाशिक शहरअध्यक्ष योगेश गांगुर्डे, महिला शहरअध्यक्ष विद्याताई शिन्दे हे होते. यावेळी आय.टी. जिल्हाअध्यक्ष अभिजित औताडे, युवक शहरअध्यक्ष योगेश आहिरे,  निलम पवार, ड्रा.प्रिती दांडगे, जयश्री जांभळे, चैताली बोढाई, रेश्मा कापसे, रोहिणी कापसे, गायत्री कापसे, अक्षय राजपुत, सुदर्शन हिरे, मिथुन हिरे, कामिनी भानवशे, आशा थोराईत, जयश्री जाधव, अलका फराटे, स्मिता जाधव आदींसह महिला पदधिकारी व छावा पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।