शेती हा विषय आत्मसन्मान मिळण्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव निर्माते आनंद पगारे यांनी करून दिली !! कृषी कन्या नंतर सपन सरलही यशस्वी होईल- प्रा. डॉ. शंकर बोराडे !! आनंद पगारेंच्या जिद्दीला सलाम ची सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

आनंद पगारे यांच्या  जिद्दीला सलाम- प्रा. डॉ. शंकर बोराडे
         नाशिक: आनंद पगारे मालेगाव तालुक्यातून लहानशा गावातून येऊन स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. 'कृषी कन्या' ह्या लघुचित्रपटास महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रथम क्रमांक मिळाला. याची निर्मिती आनंद पगारे यांनी करून शेती हा विषय आत्मसन्मान मिळण्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली आहे. कठोर परिश्रम व जिद्दीतून पगारे काम करत आहेत त्यांच्या कार्याला सलाम आहे . ते निर्मिती करत असलेल्या "सपन सरल" हा शेतकरी विषयावरील चित्रपट हि  महाराष्ट्रात यशस्वी होईल यासाठी साहित्यिक प्रा. डॉ. शंकर बोराडे यांनी आनंद पगारे यांच्या सत्काराप्रसंगी मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले शाल, स्मृती चिन्ह वृक्ष रोप देऊन सत्कार केला व चित्रपट यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
          कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय व महर्षी चित्रपट संस्था नाशिक यांच्या वतीने १२ आगस्ट २०१९ रोजी सुर्वे वाचनालयात आनंद पगारे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यांचा "कृषी कन्या" ह्या लघुचित्रपटास महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांक मिळाला व मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता, याबद्दल  सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सचिव "पुरोगामी" कादंबरी चे लेखक राकेश वानखेडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महर्षी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे यांनी केले. परिचय राम खुर्दळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुर्वे वाचनालयाचे विश्वस्त राजू देसले यांनी केले आभार प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी मानले. स्वागत दत्तू तुपे, नागार्जुन वाडेकर यांनी केले. या प्रसंगी  प्रगतिशील लेखक संघ च्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी कवी प्रमोद अहिरे व जिल्हा सचिव पदी प्रल्लाद पवार ,उपाध्यक्ष पदी विश्वास वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल साहित्यिक प्रा. डॉ शंकर बोराडे व प्रगतिशील लेखक संघ चे राज्य सचिव राकेशजी वानखेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी काशिनाथ वेलदोडे, डॉ. विशाल जाधव, रविकांत शार्दूल, नाना गांगुर्डे, माया खोडवे, कचरू वैद्य, प्रमोद अहिरे, विश्वास वाघमारे, आरती बोराडे, विलास नलावडे, प्रा. रामदास भोंग, सचिन मालेगावकर ,किरण मालूनजकर ,महादेव खुडे, अविनाश दोंदे, आभा थोरात आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक