२८ वी वार्षीक क्रिडा स्पर्धा २०१९ चा समारोप सोहळा कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्ट.जनरल आर.एस.सलारीया यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ! विजयी खेळाडू पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरतील व यश संपादन करतील-पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल-संपादक नरेंद्र पाटील !!!!!

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आयोजित २८ वी वार्षिक किडा स्पर्धा २०१९ चा समारोप सोहळा पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्ट.जनरल आर.एस.सलारीया यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आजचा दिवस हा
मेजर ध्यानचंद यांचा स्मृती दिन असल्याने संपूर्ण भारतात किडा दिन साजरा केला जातो.
सदर किडा स्पर्धा २७ ते २९ ऑगस्ट, २०१९ या कालावधीत पार पडली.  किडा स्पर्धेत
पोलास आयुक्तालयातील परिमंडळ १, परिमंडळ२, पोलीस मख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय व
इतर शाखा अशा ०४ संघांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत एकुण १५० पोलीस खेळाडूंनी भाग घेतला
होता. स्पर्धेमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅन्डबाॅल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो असे पुरुष
सांधीक खेळ व महिलांकरीला व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबडडी, खो-खो यांचा समावेश होता.
वैयक्तीक खेळांमध्ये पुरुष व महिलांचे १००, २००, ४००, ८००, १५०० मीटर धावणे, उंचउडी,
लांबउडी, गोळाफेक, भालाफेक, रिले. क्रासकंट्री, मॅरेथॉन तसेच कुस्ती,  बाॅक्सिंग, वेटलिफ्टीग, जुडो, तायक्वांदो यांचा समावेश होता.
स्पर्धा अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बेस्ट अॅथलीट पुरुष- पोशि/२१३६ संतोष गुबडे व बेस्ट अॅथलीट महिला मपोशि/२८१४ पुष्पा कहांडुळे दोन्ही नेमणुक पोलीस मुख्यालय तसेच सदर क्रिडा स्पर्धेत जनरल चॅम्पीयनशीप पोलीस मुख्यालय या संघास मिळाली. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पौर्णिमा चौगुले-श्रीगी, पोलीस उपायुक्त, पोलीस मुख्यालय यांनी ट्रॉफी स्विकारली. सदर कार्यक्रमास पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १,अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ श्री.विजय खरात, लेफ्ट कर्नल विवेक शर्मा व प्रतिष्ठीत नागरिक, शांतता कमिटी सदस्य, पत्रकार तसेच पोलीस
खेळाडू हे उपस्थित होते. बक्षिस पात्र खेळाडूंना (सोबत यादी) कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी
देवळालीचे लेफ्ट,जनरल आर.एस.सलारीया यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. त्यांनी आपले
अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना नाशिक शहर पोलीस कामकाजा बाबत प्रशंसा व्यक्त
करुन नाशिक शहर पोलीसांची चांगली कामगीरी नेहमीच वर्तमान पत्रात वाचण्यास मिळते. तसेच
नाशिक शहर पोलीस व आर्मी यांच्यात नाशिकमध्ये चांगला समन्चय सहकार्य असून नाशिक शहर
पोलीस दल यांचे नेहमीच जलद प्रतिसाद असतो. मा.पंतप्रधान यांचे फिट इंडीया उपक्रमास सदरची
किडा स्पर्धा घेवून नाशिक शहर पोलीसांनी चांगले योगदान दिले आहे. तसेच त्यांनी सर्व खेळाडूंचे
कौतूक करुन सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
               पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी आपल्या मनोगतात माहिती दिली की,या स्पर्धेत विजयी होणारे पुरुष-महिला खेळाडू हे नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे होणाऱ्या परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत सहभागी होतील आणि नाशिक परिक्षेत्रीय पोलीस किडा स्पर्धेत निवड झालेले खेळाड़ हे जानेवारी २०२० मध्ये नाशिक पोलीस अॅकडमी येथे होणान्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेत सहभागी होतील.
सन २०१९ मध्ये परिक्षेत्रीय संघात सहभागी केल्या नंतर नाशिक पोलीस आयुक्तालय संघाने मागील वेळेस पुरुष व महिला चम्पीयनशीप मिळविलेली आहे. तसेच राज्यस्तरीय पोलीस क्रिडा स्पर्धेत नाशिक आयुक्तालयातील बास्केटबाल पुरुषसंधाने १ वेळेस सुवर्ण, ३ वेळा रौप्य व २ वेळेस कास्य पदक मिळविले आहे. हॅन्डबॉल संघाने २ वेळेस सुवर्ण, ०९ वेळा रौप्य व ०२ वेळेस कास्य पदक मिळविले आहे. बास्केटबॉल व हॅन्डबॉल मध्ये ०८ खेळाडूंनी अखिल भारतीय क्रिडा
स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव