जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नाशिक संस्थेची ३० वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न ! कोल्हापूर-सांगली पुरग्रस्तांसाठी संस्थेच्या वतीने मदत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


     नाशिक::- जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नाशिक संस्थेची ३० वी सर्वसाधारण सभा खेळीमेळी च्या वातावरणात अध्यक्ष विक्रम पिंगळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली.  ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मासिक वर्गणी १०००  रु. करण्यास सर्वानुमते मंजूरी दिली. संस्थेच्या मालकीची स्वताची इमारत व्हावी अशी सभासद व संचालक मंडळाची इच्छा असून त्यासाठीच्या निधीत दरवर्षी तरतूद करण्यात येत आहे त्याप्रमाणे याही सर्वसाधारण सभेने १० लक्ष इतक्या निधीस मंजूरी दिली. सन २०१८/१९ साठी ९% लाभांशला मंजूरी दिली. संस्थेची सभासदांना एस एम एस सुविधा सुरू केली याबद्दल सभासदांनी अध्यक्ष विक्रम पिंगळे व संचालक मंडळाचे व अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने कोल्हापूर-सांगली पुरग्रस्त नागरिकांना २५००० रु   (वस्तु स्वरुपात) देण्याचे जाहिर केले.
           याप्रसंगी सभासद पाल्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सभेस अध्यक्ष विक्रम पिंगळे, उपाध्यक्ष नितिन पवार, सचिव भाऊसाहेब पवार,
विजयकुमार हळदे, पंडितराव कटारे, राजेंद्र भागवत , जी.पी. खैरनार, मधुकर आढाव, पांडुरंग वाजे , नितिन भडकवाडे, अमित आडके, संदीप दराडे, किशोर वारे, विमलताई घोडके, मंगलाताई बोरसे, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।