आज २२ जून, नासिककरांनी रोटरी हाँल, गंजमाळ येथे सायं. ७:०० वा. आवर्जुन उपस्थित राहायलाच हवे, आबालव्रुद्धांसह, तरूणांनी तर नक्कीच हजेरी लावावी, "माँ तुझे सलाम" या देशभक्ती कार्यक्रमाला, शहीद कोण होतो , कुणासाठी होतो, अन् त्याचे मातापिता ? प्रश्नाचे उत्तर शोधायलाच हवे !! कार्यक्रमाविषयी सविस्तर माहीतीकरीता खालील लिंकवर क्लिक करा !!

नासिक::-देश रक्षणासाठी सीमेवर शत्रुराष्ट्राशी लढतांना शहिद होण्याचे वय फक्त २० वर्ष ? आणी खेळण्या-बागडण्याच्या वयातलं पोरगं देशासाठी अर्पण करणाऱ्या मातापित्यांचे मनातली घालमेल काय असेल ? साधा विचार करतांच अंगावर काटा ( शहारे नव्हे) उभा राहतो, पण त्या मातापित्यांप्रती जी भावना समाजाकडून व्यक्त व्हायला हवी तशी आज होतांना दिसत नाही, याचा अर्थ समाजांत तसे घटक नाहीत असे नाही, पण व्यक्त कसे व्हावे याचा मार्ग त्यांना अवगत होत नाही तेथे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ कमीतकमी एका शहीदाच्या कुटुंबाच्या मागे ऊभे राहण्याचा प्रयत्न करतो हि विशेष उल्लेखनीय बाब समजायला हवी, समाजासाठी एक सकारात्मक संदेश पोहचविण्याचे काम महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ करीत आहे. 
         शहीद शुभम मस्तापुरे , अवघा वीस वर्षाचा तरूण देशासाठी ३ एप्रिल २०१८ रोजी धारातीर्थी पडला, त्याच्या मातापित्याचा सन्मान शुक्रवार दि. २२ जुन रोजी सायं. ७ ते १० या वेळेत रोटरी क्लब, गंजमाळ येथे "माँ तुझे सलाम" या देशभक्तीपर संगीत रजनी च्या माध्यमातून मानवंदनेच्या रूपात होत आहे, महासंघाकडून वीरमाता-पित्यास १,११,०००/- रूपयांची आर्थिक मदत देऊन क्रुतज्ञता व्यक्त केली जाणार आहे, महासंघच नव्हे तर कुणीही शहिदांच्या मातापित्यांची वा कुटुंबाच्या त्यागाची परतफेड करू शकत नाही, मात्र तमाम देशवासींयांमध्ये ही क्रुतज्ञतेची भावना रूजविली जावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती महासंघातर्फे देण्यात आली व तमाम देशप्रेमींनी हजर राहून मानवंदनेसह क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे,
-जयहिंद-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।