व्हर्च्युअल क्लासरुमची जिल्हयाने यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पध्दतीने व्हर्च्युअल क्लासरुम हा उपक्रम राबविण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला !! असा कोणता जिल्हा व कोण जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक – आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण् शिक्षण उपलबध करुन देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरुम महत्वाच्या आहेत. यासाठी नाशिक जिल्हा परिषदेमार्फत प्रायोगिक तत्वावर सामाजिक बांधिलकी (सीएसआर) या उपक्रमातून उपलब्ध होणा-या निधीतून व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना जिल्हा परिषदेच्या 100 शाळांमध्ये राबविण्यात येणार असून आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या उपक्रमाचे प्रात्यक्षिक सादर केले.
             व्हर्च्युअल क्लासरुमबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, युवानेते उदय सांगळे यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून याबाबत माहिती देवून या उपक्रमाचे संगणकीय सादरीकरण केले. पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देतानाच नाशिक जिल्हयाने याची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पध्दतीने व्हर्च्युअल क्लासरुम हा उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी बोलून दाखवला.शहर व गाव यांच्यातील दरी कमी करण्यासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण् शिक्षण उपलबध करुन देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरुमचा प्रयोग नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. प्रस्तुतचा उपक्रम नाशिक जिल्हयात पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न असल्याचे शितल सांगळे यांनी यावेळी नमूद केले.
               या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या उपक्रमाचे कौतूक करुन मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नाशिक जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर या उपकमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी रुपयांपर्यतचा निधी सामाजिक बांधिलकी (सीएसआर) उपक्रमांतर्गत्‍ जमा करण्यात येणार आहे. यातून निवडलेल्या शाळांना व्हर्च्युअल क्लासरुमसाठी संगणक,एलईडी देण्यात येणार आहेत. नाशिकच्या केंद्रातून एकाचवेळी विविध तज्ञांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विविध सामाजिक व सेवाभावी संस्था, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व तज्ञ शिक्षकांचा  सहभाग घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी सांगितले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन ! मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा !! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा !!! कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!