धर्म आणि राजकारणाच्या शुध्दीसोबत महिला सक्षमीकरण चळवळीत शांतीगीरीजींचे मोलाचे योगदान ! म्हाळसामाता ध्वजारोहण सोहळ्यात छ. संभाजीराजेंचे गौरवोद्गार !! रक्षाबंधनानिमित्त महिलांना वस्रदान व कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांना आर्थिक तसेच वस्तूरुपाने मदतीचा हात, जयबाबाजी परीवार व छावा क्रांतीवीर सेनेचा सामाजिक उपक्रम !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

धर्म आणि राजकारणाच्या शुध्दीसोबत महिला सक्षमीकरण चळवळीत  शांतीगीरीजींचे मोलाचे योगदान ! म्हाळसामाता ध्वजारोहण सोहळ्यात छ.संभाजीराजेंचे गौरवोद्गार
           ओझर (प्रतिनिधी ) :- निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सर्वांगाने  प्रयत्न केले आहेत. आणि आजही अखंड सुरू आहे. त्यांच्या कार्याने मी प्रभावित झालो असून
महिला सक्षमीकरणासाठी महाराजांचे मोठे योगदान आहे. अध्यात्मिक मार्गदर्शना बरोबरच राजकारणाच्या शुद्धीकरणाचे देखील कार्य ते करत आहेत, याचा मनस्वी आनंद व्यक्त करतांनाच छत्रपती घराण्यावर बाबाजींचा सदैव आशीर्वाद असावा असे विचार  छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार  छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.
      निष्काम कर्मयोगी जागदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर
अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर
समर्थ सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत ओझर येथील आश्रमात दिनांक १९ ते २६ सप्टेंबर दरम्यान जगद्माऊली मातोश्री म्हाळसामाता यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार आहे.या सोहळ्याचे ध्वजारोहण  छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते मोठया उत्साहपूर्ण वातवरणात सम्पन्न झाले. यावेळी छत्रपती खा.संभाजीराजे भोसले म्हणाले की, परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांचे कार्य अध्यात्मा बरोबरच  सर्वार्थाने समाजहिताचे असून राजकारणाच्या शुद्धीकरणाचे देखील त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहे.बाबाजीं बद्दल मोठा आदर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दुग्धविकास व पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते, त्यांनीही आपल्या मनोगतानुन जगद्माऊली म्हाळसामाता यांना अभिवादन करतानाच अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. देव-देश-धर्मा साठी महाराजांचे मोठे योगदान असून महिला सक्षमीकरणा बरोबरच  आश्रमाच्या वतीने वेळोवेळी समाजहितासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संभाजीराजे यांच्या कार्याचाही गौरव  केला. छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यांनीही बाबाजींच्या आणि राजेंच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. व्यासपीठावर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार अपूर्व हिरे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नासिक महापालिकेचे स्थायी समिती सभापती उद्धव निमसे,  शिवाजी सहाणे,माजी आमदार मंदाकिनी कदम, पिंपळगावच्या सरपंच श्रीमती अलकाताई बनकर, जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका वैशाली कदम, सामाजिक कार्यकर्त्या माधवी पाटील, दामोदर मानकर, सुनील आडके, शिवाजी गांगुर्डे, पंडित भुतेकर, यांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ परमपूज्य बाबाजींच्या पालखी मिरवणुकीने करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत -पूजन आश्रम सेवा समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी 
मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना वस्त्रदान करण्यात आले. पुरग्रस्थानां साहित्य आणि प्रत्यक्ष मदतीसाठी भक्त परिवाराच्या वाहनांचे कोल्हापूरला प्रस्थान झाले. याप्रसंगी तोलाजी शिंदे आणि सुरेश जाधव यांनी पंचवीस हजाराचा तर राजेश शिंदे बापूशेठ पिंगळे यांनी पस्तीस हजाराचा धनादेश छञपती खा.संभाजीराजे  यांच्याकडे सुपुर्द करून पुरग्रस्तांचे अश्रू पुसण्याच्या मोहीमेत खारीचा वाटा उचलत सामाजिक उत्तरदायित्व जपले.प्रास्ताविक विष्णू महाराज यांनी तर उपस्थितांचे आभार भक्त परिवारातील सदस्य या नात्याने खासदार हेमंत गोडसे यांनी मानले.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आश्रम विश्वस्त,जय बाबाजी म्हाळसा माता महिला मंडळ यांच्यासह छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश युवा अध्यक्ष शिवा तेलंग, प्रदेश युवाचे अध्यक्ष प्रा.उमेश शिंदे, शिवाजी मोरे, विजय खर्जुल, संतोष माळोदे, नितीन सातपुते, नवनाथ शिंदे, सागर पवार, नितीन दातीर, अविनाश सोनवणे, नितीन पाटील, पुजा धुमाळ, वंदना कोलते, मनोरमा पाटील, किरण बोरसे, थोरात आदी पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील होते.


Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन ! मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा !! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा !!! कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!