शहराच्या सौंदर्यात भर व शहराची एक विशिष्ट ओळख निर्माण व्हावी या उदात्त हेतूने एसकेडी ग्रुपने सहभाग नोंदवत रस्ता सुशोभीकरण कामाचा केला उद्घाटन सोहळा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

एसकेडी ग्रुप च्या वतीने भोसला मिलिटरी स्कुल गेट ते दूधवाला कॉर्नर रस्ता सुशोभीकरण  उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
     नासिक (१५)::-केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नासिक शहराची निवड झाली आहे, शहर स्वच्छ व सुंदर करण्याची जबाबदारी सरकारची आहे असे जर प्रत्येकाने ठरवले तर कधीच ते शहर स्वच्छ व सुंदर होऊ शकत नाही, सर्वांचा सहभाग असला तरच हे शक्य होईल, यासाठी आपले आपल्या शहरासाठी चे योगदान असावे, शहराला सामाजिक, व्यावसायिक दर्जा प्राप्त व्हावा व जागतिक पातळीवर एक विशिष्ट ओळख निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने नासिकच्या सुप्रसिद्ध एसकेडी ग्रुप ने महात्मानगर येथील भोसला महाविद्यालय ते दुधवाला काॅर्नर हा रस्ता सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, सुंदर व सुशोभित करण्यात येत असलेल्या कामाचे उद्घाटन निमंत्रितांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी नाशिक महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते , माजी स्थायी सभापती सौ.हिमगौरी आहेर-आडके,  नगरसेविका सौ.राधाताई बेंडकुळे, विष्णूपंत बेंडकुळे, नगरसेवक योगेश हिरे, एसकेडी ग्रुप चे संचालक संजय देवरे व सौ.मीना देवरे, अंकुर सुराणा, पोपट देवरे व एसकेडी ग्रुप चा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!