राज्यपालांनी घेतली कुपोषणावरील कार्याची दखल ! ग्रामविकास अधिकाऱ्याचा सत्कार !! शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावरही भर देणार-मुख्य कार्यकारी अधिकारी !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


नाशिक  –  नाशिक जिल्ह्यात कुपोषण निर्मुलनासाठी ३ हजारापेक्षा जास्त ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनाच्या कामाची राज्याच्या राज्यपालांनीही दखल घेतली असून या कामासाठी सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहानेही कुपोषण निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाची दखल घेऊन या कामात सहभाग घेतला आहे. प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्ह्यातून कुपोषणाचे उच्चाटन करून सर्व बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी व्यक्त केला.
सिन्नर  तालुक्याची तालुकास्तरीय आढावा बैठक आज सिन्नर येथील ज्वालामाता मंगल कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी दत्तात्रय मुंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी ईशाधिन शेळकंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे,ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, गट विकास अधिकारी रत्नाकर पगार आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ गिते म्हणाले कि, कुपोषण निर्मुलनासाठी जिल्ह्यात ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आली असून त्यामधून कुपोषित बालकांना आहार व औषध देण्यात येत आहेत. मात्र तरीदेखील काही बालक सर्वेक्षणातून सुटली असल्यास पुन्हा सर्वेक्षण करून वंचित राहिलेल्या बालकांना शोधून त्यांना ग्राम बाल विकास केंद्रात करावे. तसेच आरोग्य, महिला व बालकल्याण व ग्रामपंचायत विभागांनी समन्वयाने कुपोषण निर्मूलनाचे काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी ग्राम बाल विकास केंद्राबाबत आढावा घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळवे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेलकंदे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी दुषित पाणी नमुने, टीसीएल तपासणी याबाबत सविस्तर आढावा घेतला. शौचालय वापराबाबत प्रत्येक गावात जनजागृती करून हागणदारीमुक्त गावाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतिने प्रयत्न करावे व या कामात सातत्य ठेवण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात ग्रामपंचायतीतील सर्व जलकुंभ, हातपंप, पाण्याचे स्त्रोत यांची स्वच्छता करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी अस्थापनाविषयक बाबींचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी अंगणवाडीच्या अपूर्ण बांधकामाचा तसेच नादुरुस्त अंगणवाड्याचा आढावा घेऊन सदरची काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेत नाशिक जिल्ह्याचे काम समाधानकारक असून ३ महिन्यापूर्वी नाशिक जिल्हा देशात २२५ क्रमांकावर होता मात्र आज जिल्हा १०६ क्रमांकावर आला असल्याचे डॉ गिते यांनी सांगितले मात्र नाशिक जिल्ह्यात या योजनेत सिन्नर तालुका सर्वात मागे असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रत्येक ग्रामसेवकाचा आढावा घेऊन घरकुल पूर्ण करण्याचे आदेश दिले. यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाकडून काम पूर्ण होण्याची मुदत लेखी स्वरुपात लिहून घेण्यात आली.
यावेळी जलयुक्त शिवार अभियान, सिंचन विहिर, विहीर पुनर्भरण, पाणी पुरवठा योजना, ग्राप मधील जन सुविधेचे कामे, घरकुल इ योजनाची अपूर्ण बांधकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी डॉ गिते यांनी सर्व संबंधिताना दिले. आढावा बैठकीसाठी  जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामविकास अधिकाऱ्याचा सत्कार

कुपोषण निर्मूलनाचे काम हे फक्त महिला व बालविकास व आरोग्य विभागाचे आहे असे समजून अन्य यंत्रणा त्यात सहभागी होत नाही मात्र सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी येथील ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी याकामात स्वत; पुढाकार घेतला आहे. गावात एकूण ४१७ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात १२ तीव्र कुपोषित तर २९ मध्यम कुपोषित बालक आढळून आली. या बालकासाठी गावात ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्यात आले असून यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार आहार व औषध देण्यात येत आहेत. आहार व औषधांमुळे १२ तीव्र कुपोषित बालक मध्यम कुपोषित श्रेणीत गेली असून मध्यम कुपोषित बालकांपैकी १४ बालक सर्वसाधारण श्रेणीत गेली आहेत. या कामात योगदान दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गिते यांनी येथील ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांचा शेवग्याचे झाड देवून सत्कार केला.

जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणार

कुपोषण निर्मुलना प्रमाणेच जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात १५ जून रोजी झालेल्या शाळा प्रवेश सोहळ्याची शासनाने दखल घेतली असून जिल्ह्याचे कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व खाजगी शाळेतील मुले जिल्हा परिषद शाळेत आणण्यासाठी यापुढे काम करण्यात येणार आहे. यासाठी स्वत शाळांना भेटी देऊन शिक्षणाचा दर्जा तपासणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकाची व शिक्षण विभागाची आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्ह्याने नुकताच एक संस्थेशी ५ वर्षासाठी करारही केला आहे. त्यामुळे यापुढे आपण शिक्षणाचा सखोल आढावा घेणार असल्याचे डॉ गिते यांनी सांगितले.

07387333801

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।