ग्रामसेवक निलंबित ! सीईओंच्या सूचनांचेही पालन न करण्यासारखे गंभीर वर्तन, समज देऊनही घरकुल पुर्ण न करणे, दप्तर दिरंगाई, दप्तर ग्रामपंचायतीत न ठेवता स्वत:च्या ताब्यात ठेवणे, !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


नाशिक (२१):– कळवण तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक सुनिल महाले यांना घरकुल पूर्ण न करणे, दप्तर अद्यावत न ठेवणे तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामपंचायतीत न ठेवता स्वतच्या अखत्यारीत ठेवणे आदि गंभीर कारणांमुळे जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी याबाबतची कार्यवाही केली.

कळवण तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायतमध्ये सुनील महाले ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. मात्र ग्रामपंचायतीत काम करताना विविध कामकाज अपूर्ण असल्याने तसेच कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांना वेळोवेळी समज देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील त्यांच्या कामात सुधारणा झालेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा बैठकीत तसेच विडीओ कॉन्फरन्समध्ये सूचना देऊनही त्याचे पालन न करता गावातील अपूर्ण घरकुल पूर्ण न करणे, ग्रामपंचायतीचे दप्तर नमुना अद्यावत न ठेवणे, ग्रामपंचायतीचे शासकीय दप्तर ग्रामपंचायतीत न ठेवता स्वतच्या अखत्यारीत ठेवणे, अपूर्ण दप्तर तपासणीसाठी सादर करणे या विविध गंभीर कारणांमुळे सदर ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।